Tarun Bharat

अर्जेंटिना-चिली सामना बरोबरीत

वृत्तसंस्था/ सांतियागो

2022 साली होणाऱया फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीच्या गुरुवारी येथे झालेल्या सामन्यात यजमान अर्जेंटिनाला चिलीने 1-1 असे गोलबरोबरीत रोखले.

गुरुवारच्या या सामन्यात लायोनेल मेसीने पूर्वार्धात गोल नोंदवून अर्जेंटिनाला आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर सांचेज मॅरीपेनने 37 व्या मिनिटाला गोल नोंदवून चिलीला बरोबरी साधून दिली. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला होता. पण उत्तरार्धात निर्णायक गोलाची नोंद न झाल्याने हा चुरशीचा सामना अखेर बरोबरीत राहिला. हा सामना बरोबरीत राहिल्याने अर्जेंटिनाला पूर्ण 3 गुण मिळविता आले नाहीत. अर्जेंटिना आणि चिली यांच्यात आतापर्यंत 35 सामने अर्जेंटिनाच्या भूमीवर झाले असून त्यामध्ये अर्जेंटिनाचा संघ एकाही सामन्यात पराभूत झालेला नाही. 2022 साली कतारमध्ये होणाऱया विश्वचषक करंडक फुटबॉल स्पर्धेसाठी सध्या सुरू असलेल्या 10 संघांच्या दक्षिण अमेरिका विभागातील पात्र फेरीच्या स्पर्धेत अर्जेंटिनाने पाच सामन्यात 11 गुणासह दुसरे स्थान मिळविले आहे. या गटात ब्राझील 12 गुणासह पहिल्या स्थानावर आहे. चिली 5 गुणासह सहाव्या स्थानावर आहे.

Related Stories

लखनौचा दिल्लीला ‘हाय व्होल्टेज’ धक्का

Amit Kulkarni

इंग्लंडच्या महिला क्रिकेटपटूंच्या सरावाला सोमवारपासून प्रारंभ

Patil_p

इंग्लंडतर्फे सकिब-लीच यांची विक्रमी भागीदारी

Patil_p

ऑलिंपिक पात्रता स्पर्धेसाठी संदीप मानची जागा आरक्षित

Patil_p

विश्व नेमबाजी स्पर्धेत भारताला आणखी 2 पदके

Patil_p

राफाएल बर्गामास्को भारतात येण्यास सज्ज

Patil_p