Tarun Bharat

अर्जेंटिना-पराग्वे फुटबॉल लढत बरोबरीत

वृत्तसंस्था / ब्युनोस आयरीस

फिफाच्या आगामी विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेसाठी सुरू असलेल्या पात्र फेरीच्या सामन्यात गुरुवारी पराग्वेने बलाढय़ अर्जेंटिनाला 1-1 असे गोलबरोबरीत रोखले.

या सामन्यात पराग्वेतर्फे पूर्वार्धात अँजेल रोमेरोने पेनल्टीवर खाते उघडले. अलीकडच्या कालावधीतील रोमेरोचा आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील हा तिसरा गोल आहे. मध्यंतराला चार मिनिटे बाकी असताना निकोलास गोन्झालेझने अर्जेंटिनाला बरोबरी साधून दिली. मध्यंतरावेळी दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते. कोरोना समस्येमुळे हा सामना बोका ज्युनियर्स स्टेडियमवर प्रेक्षकांविना खेळविला गेला.

या सामन्यातील निर्णयामुळे आता अर्जेंटिना आणि पराग्वे हे दोन्ही संघ आपल्या पहिल्या तीन सामन्यात अपराजित राहिले आहेत. पात्र फेरीच्या या स्पर्धेत एकूण 18 सामन्यांचा समावेश असून अंतिम सामना कतारमध्ये खेळविला जाईल. दहा संघांच्या दक्षिण अमेरिकन गटामध्ये पहिले चार संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. तर पाचव्या स्थानावर असलेल्या संघाला आंतरविभागीय प्ले-ऑफ सामना खेळावा लागेल.

अर्जेंटिना संघाचा आता या पात्रफेरीच्या स्पर्धेतील पुढील सामना पेरू संघाबरोबर येत्या मंगळवारी होणार आहे. तर पराग्वेचा सामना याच दिवशी बोलिव्हिया संघाबरोबर खेळविण्यात येईल. पराग्वेचा हा सामना घरच्या मैदानावर खेळण्याची संधी मिळणार आहे. अर्जेंटिनाला मात्र पेरुमध्ये या आगामी सामन्यासाठी दाखल व्हावे लागेल.

पात्र फेरीच्या अन्य एका सामन्यात इक्वेडोर संघाने बोलिव्हियावर 3-2 अशा गोलफरकाने निसटता विजय मिळविला.

या सामन्यात बोलिव्हिया संघाने मध्यंतरापूर्वीच इक्वेडोरवर आघाडी मिळविली होती. पण त्यानंतर सामन्याच्या उत्तरार्धात इक्वेडोरने 2 गोल नोंदविले. मार्सेलो मॉरेनोने बोलिव्हियाचा दुसरा गोल करून सामन्यात रंगत आणली. सामना संपण्यास केवळ दोन मिनिटे बाकी असताना कार्लोस ग्रुझो याने पेनल्टीवर इक्वेडोरचा तिसरा आणि निर्णायक गोल नोंदवून बोलिव्हियाचे आव्हान संपुष्टात आणले.

Related Stories

कोरोनामुळे कोन्टा विंबल्डन स्पर्धेतून बाहेर

Patil_p

बंदी उठविण्याची कनेरियाची पीसीबीला विनंती

Patil_p

रणजी सामन्यात कुशाग्रचे द्विशतक

Patil_p

बजरंग पुनियाचा युके व्हिसा मंजूर

Patil_p

झिंबाब्वे क्रिकेट संघाची घोषणा

Patil_p

पाक संघ सेमीफायनल निश्चितीसाठी सज्ज

Patil_p