Tarun Bharat

अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

Advertisements

दुसऱया टप्प्यातील अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरूवात

प्रतिनिधी/ बेळगाव

ग्राम पंचायत निवडणुका जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवार दि. 11 रोजी शेवटचा दिवस असून उद्या अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्मयता आहे. ग्राम पंचायत निवडणुकीसाठी अनेक जण इच्छुक आहेत. ग्राम पंचायतीची पहिली पायरी म्हणून त्याकडे पाहिले जाते. त्यामुळे तरुणवर्ग त्याकडे अधिक वळला असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. शुक्रवारी पहिल्या टप्प्यातील अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे तर दुसऱया टप्प्यातील अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे.

पहिल्या टप्प्याची निवडणूक 22 डिसेंबर रोजी होत आहे. गुरुवारी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे अर्ज दाखल करण्यास मोठी गर्दी होणार आहे. गेल्या तीन दिवसांमध्येही एनकांनी अर्ज दाखल केले आहेत. बुधवारी तब्बल 1557 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. बेळगाव जिल्हय़ात दोन टप्प्यात ही निवडणूक होत आहे. 22 डिसेंबर आणि 27 डिसेंबर रोजी ही निवडणूक होत असून या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने सर्व ती तयारी पूर्ण केली आहे. दि. 11 पासून दुसऱया टप्प्याच्या निवडणुकीचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. 16 डिसेंबर अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस राहणार आहे.

Related Stories

हिंडलग्याच्या कंत्राटदाराची उडुपीत आत्महत्या

Omkar B

शहरातील अनेक आरओ प्लान्ट नादुरुस्त

Amit Kulkarni

अनगोळ येथील नागरिक विजेच्या समस्येने हैराण

Amit Kulkarni

गणेश विसर्जन कुंडात करण्याचे आवाहन

Amit Kulkarni

अनमोड येथे अरण्य प्रदेशात वाघाच्या हल्ल्यात आणखी एका बैलाचा बळी

tarunbharat

शाळा-पीयू कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे आजपासून लसीकरण

Amit Kulkarni
error: Content is protected !!