Tarun Bharat

अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची घाईगडबड

बेळगाव  / प्रतिनिधी

अर्ज भरण्यासाठी केवळ एक दिवसाचा कालावधी शिल्लक राहिल्याने ग्राम पंचायत निवडणुकीतील इच्छुकांची धांदल उडाली असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. जसजशी निवडणुकीची तारीख जवळ येईल तसतशी निवडणुकीतील रंगत दिवसेंदिवस वाढत असून अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांची धडपड सुरू झाली असून इच्छुकांसाठी आता केवळ एका दिवसाचा कालावधी शिल्लक आहे.

शुक्रवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने इच्छुकांना घाईगडबडीत कागदपत्रांची जमवाजमव करून अर्ज दाखल करावा लागणार आहे. ग्रामीण भागातील इच्छुकांची कागदपत्रांसाठी बेळगाववारी सुरू असून निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी इच्छुक मग्न झाल्याचे दिसून येत आहे.

 कागदपत्रांसाठी गर्दी

गुरुवारी शहरातील कोर्ट परिसर, कचेरी गल्ली यासह तहसिलदार कार्यालयात इच्छुकांबरोबर समर्थकांनी कागदपत्रांसाठी गर्दी केली होती. परिसरातील झेरॉक्स सेंटर, टायपिंग सेंटरांना अच्छे दिन आले आहेत. अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची कचेरी गल्लीतील टायपिंग सेंटरवर वर्दळ वाढल्याचे दिसत आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख शुक्रवारी असल्याने सायंकाळी उशिरापर्यंत अर्ज दाखल होतील. निवडणुकीत आजी-माजी सदस्यांबरोबर युवा पिढीचादेखील सहभाग वाढला असून अर्ज भरणाऱयांमध्ये युवावर्गाची संख्या अधिक आहे. अर्ज भरण्याची तारीख शुक्रवारी संपल्याने शनिवारपासून प्रचाराला वेग येणार असून भावी सदस्यांकडून आश्वासनांचा पाऊस पडणार आहे.

 जसजशी निवडणुकीची तारीख जवळ येईल तसतशी निवडणुकीतील रंगत वाढत असून मतदारांच्या रात्रीच्या गाठीभेटी, पाटर्य़ांचे आयोजन, नकळत प्रचार करणे यासह गावागावातील चौकाचौकात निवडणुकीची चर्चा रंगत आहे.

Related Stories

एकाच कुटुंबातील पाच जणांना कोरोना

Patil_p

यंदाचा गळीत हंगाम एक महिना उशिरा

Amit Kulkarni

वयाच्या 85 वर्षी ठरले शेवटचे मतदान

Rohit Salunke

जांबोटी परिसरात मिरची पिकावर रोगाचा प्रादुर्भाव

Omkar B

खानापूर म. ए. समितीचा पाठिंबा

Amit Kulkarni

खानापूर बँकेच्या चेअरमनपदी अमृत शेलार

Amit Kulkarni
error: Content is protected !!