Tarun Bharat

अर्थसंकल्पीय अधिवेशनात गोंधळ घाल्याने भाजपच्या तीन आमदारांचं निलंबन

सुडबुध्दीनं तीन आमदारांचं निलंबन केल्याची भाजपची टीका

Advertisements

ऑनलाईन टीम /तरुण भारत

तेलंगणा विधानसभेत अर्थसंकल्पी अधिवेशनादरम्यान गोंधळ घातल्याप्रकरणी भाजपच्या तीन आमदारांना निलंबित करण्यात आलं आहे. अर्थमंत्री अर्थसंकल्प वाचत असताना आमदारांनी कामकाजात व्यत्यय आणला. त्यामुळे भाजपच्या तीन आमदारांना निलंबित करण्यात आलं आहे. त्यामुळे भाजप आक्रमक झाली आहे.

दरम्यान, तेलंगणा विधानसभेतील भाजपच्या तीन आमदारांना सोमवारी सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणला त्यामुळे त्यांना उर्वरित अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आलंय. त्यांच्यावर अर्थमंत्री अर्थसंकल्प वाचत असताना गोंधळ निर्माण केल्याचा आरोप आहे. यावर, भारतीय जनता पक्षानं आपली प्रतिक्रिया दिलीय. सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समितीनं सुडबुध्दीनं तीन आमदारांचं निलंबन केलंय, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष बंदी संजय यांनी केलीय.

सत्ताधारी टीआरएसनं उर्वरित अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी तीन भाजप आमदारांना विधानसभेतून निलंबित केलंय. यानंतर भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी हा निर्णय तात्काळ मागे घेण्याची मागणी केलीय. अधिवेशनासाठी विधानसभेत राज्यपालांचं पारंपरिक भाषण रद्द करण्यावरही संजय यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. परंपरेनं अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणानं होते. मात्र, टीआरएसनं पारंपरिक भाषण न करता अधिवेशन सुरू केलंय, असा आरोपही त्यांनी केलाय.

Related Stories

…मी कधी पाठीमध्ये खंजीर खुपसला नाही : एकनाथ खडसे

Rohan_P

फुले यांच्या साहित्यातून मानवमुक्तीचा मार्ग- डॉ. छाया पोवार

Abhijeet Shinde

कोट्यवधींची संपत्ती असणारे दरेकर मजूर कसे?

datta jadhav

कोणत्याही शब्दावर निर्बंध नाही

Amit Kulkarni

देशात 24 तासात 3970 नवे कोरोना रुग्ण

datta jadhav

संख्याशास्त्राचा उपयोग समस्या सोडवण्यासाठी करा

Sumit Tambekar
error: Content is protected !!