Tarun Bharat

अर्धा नर अन् अर्धी मादी असलेला पक्षी

Advertisements

अमेरिकेत दिसून आला दुर्लभ पक्षी

अमेरिकेच्या पेन्सिलवेनिया शहरात पक्ष्यांवर नजर ठेवणारे तज्ञ जेम्स आर. हिल तृतीय यांनी एका अशा दुर्लभ पक्ष्याचे छायाचित्र मिळविले आहे, जो अर्धा नर आणि अर्धी मादी आहे. अशाप्रकारच्या पक्ष्याला पाहण्याची संधी जीवनात एकदाच प्राप्त होते असे जेम्स यांनी म्हटले आहे. जेम्स मागील 48 वर्षांपासून पक्ष्यांसाठी काम करत आहेत. अर्धा नर अन् अर्धी मादी असलेला पक्षी 10 लाख पक्ष्यांमध्ये एकच असतो. या दुर्लभ कार्डिनल पक्ष्याचा नरयुक्त हिस्सा लाल तर मादीयुक्त हिस्सा पांढऱया रंगाचा आहे. या पक्ष्यातील हा बदल डबल फर्टिलायजेशनमुळे झाल्याचे जेम्स यांनी सांगितले आहे. जेम्स यांना त्यांच्या एक मित्राने गँड व्हॅलीमध्ये एका घराबाहेर असाधारण पक्षी असल्याचे कळविले होते. हिल यांनी फेसबुकवर या पक्ष्याची छायाचित्रे प्रसारित करत माहिती दिली आहे. कार्डिनल पक्षी स्वतःच्या लाल चमकदार रंगामुळे ओळखले जातात, पण हे वैशिष्टय़ केवळ नर पक्ष्यात असते.

Related Stories

खिसाच्या दिग्दर्शकाची प्रेरणादायी कहाणी

Patil_p

अभिनेत्री पूजा बिरारी घराच्या शोधात

Patil_p

वारकऱयांसाठी आगळेवेगळे विठ्ठल दर्शन

Patil_p

गौतमी आली धावून

Patil_p

अक्षयचा ‘बच्चन पांडे’चा ट्रेलर रिलीज

Patil_p

अमेझॉन-नेटफ्लिक्सची अनुष्कासोबत भागीदारी

Patil_p
error: Content is protected !!