Tarun Bharat

अर्सेनलच्या साकाचा प्रिमियर लीगमधील पहिला गोल

वृत्तसंस्था/ उल्व्हरहॅम्पटन

प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेत अर्सेनलचे प्रतिनिधित्व करणारा बुकायो साकाने शनिवारच्या सामन्यात आपला पहिला गोल नोंदविला. शनिवारी या स्पर्धेतील झालेल्या सामन्यात अर्सेनलने उल्व्हेसचा 2-0 अशा गोलफरकाने पराभव करून चॅम्पियन्स लीग स्पर्धेसाठी पात्रतेच्या विभागात आपले आव्हान जिवंत ठेवले आहे.

अर्सेनल संघाने या स्पर्धेत यापूर्वी सलग तीन सामने जिंकले आहेत. शनिवारच्या सामन्यातील विजयामुळे अर्सेनल संघाने स्पर्धेच्या गुणतक्त्यात ते पाचव्या स्थानावर आहेत. आर्सेनेल संघ मँचेस्टर युनायटेड संघापेक्षा 6 गुणांनी पिछाडीवर आहे. आता या स्पर्धेतील आर्सेनेलचे पाच सामने बाकी आहेत.

शनिवारच्या सामन्यात बुकायो साकाने पहिल्या पंधरा मिनिटातच आर्सेनेलचे खाते उघडले. त्यानंतर खेळाच्या उत्तरार्धात लेकाझेटीने आर्सेनेलचा दुसरा गोल नोंदवून उल्व्हेसचे आव्हान एकतर्फी संपुष्टात आणले.

Related Stories

जो रूटच्या धमाक्याने इंग्लडचा पहिल्या डावात धावांचा डोंगर

Archana Banage

भारत-अफगाण लढतीत सुनील छेत्रीवर फोकस

Patil_p

इंडिया लिजेंड्स संघाचे सलग दुसरे जेतेपद

Patil_p

महिला संघाला कणखर मानसिकतेची गरज

Patil_p

टी-20 मालिकेत दक्षिण आफ्रिकेची विजयी सलामी

Patil_p

दशकांपूर्वीचा ‘विनोद’ ऑलिम्पिक उद्घाटन संचालकांना भोवला

Amit Kulkarni