Tarun Bharat

अलतगा ग्रामस्थांचा कचरा डेपोला तीव्र विरोध

जिल्हाधिकाऱयांना निवेदन : आंदोलनाचा इशारा

प्रतिनिधी / बेळगाव

कंग्राळी खुर्द ग्राम पंचायतीच्या अखत्यारित येणाऱया अलतगा गावच्या हद्दीमधील सर्व्हे क्रमांक 55 मध्ये कचरा डेपो करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तेथे कचरा डेपो केला तर मोठी समस्या निर्माण होणार आहे. शेतकऱयांना व ग्रामस्थांना याचा त्रास होणार असून तातडीने तो प्रकल्प रद्द करावा, या मागणीसाठी अलतगा येथील देवस्थान पंचकमिटीच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले.

कंग्राळी ग्राम पंचायतीची गायरान जागा सर्व्हे क्रमांक 55 मध्ये आहे. त्यामध्ये हा कचराडेपो करण्याचा प्रयत्न सुरू आहे. गावाला लागूनच असलेली ही जागा घेतली तर जनावरांना चरण्यासाठी जागाच शिल्लक राहणार नाही. या परिसरातच विविध शाळा व महाविद्यालयेही आहेत. तेव्हा याचा गांभीर्याने विचार करावा आणि त्या ठिकाणी कचरा डेपो करु नये, अशी मागणी या निवेदनात करण्यात
आली.

ग्राम पंचायत सदस्यांनीही त्याला तीव्र विरोध केला आहे. या ठिकाणी कचरा डेपो केल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. सकाळी तसेच संध्याकाळी फिरण्यासाठीही अनेक जण या परिसरात येत असतात. त्यांनाही या कचरा डेपोचा त्रास सहन करावा लागणार आहे. या कचरा डेपोमुळे आरोग्याच्या समस्या उद्भवणार आहेत. तेव्हा याचा गांभीर्याने विचार करावा, असे या निवेदनात म्हटले आहे. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी गाव सुधारणा समितीचे आर. आय. पाटील, देवस्थान पंचकमिटीचे चंद्रकांत धुडूम, मलगौडा पाटील, ग्राम पंचायत सदस्य चेतक कांबळे,
ऍड. सुधीर चव्हाण, अशोक गुंजटकर, शैलेश पवार, कल्लाप्पा चौगुले, शिरीश घुग्रेटकर, परशराम चिखलकर, सिद्राय दळवी, दुर्गाराम पाटील, संजय पाटील, मोहन आलोजी, निंगाप्पा चौगुले, पुंडलिक पाटील, शिवाजी पावशे, इराप्पा जाधव, नारायण पाटील, अनिल पावशे, राजू पावशे, तुकाराम चौगुले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

स्मार्ट सिटी नको; मात्र ग्रीन सिटी हवी

Amit Kulkarni

युक्रेनवरून येणाऱया विमानाचे बेळगावच्या सुनेने केले सारथ्य

Amit Kulkarni

पोलिसांनी उत्तम सेवा बजावून नावलौकिक करावा

Amit Kulkarni

आशा कार्यकर्त्यांना मासिक 12 हजार मानधन द्या

Patil_p

अनगोळात दसरोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

Amit Kulkarni

खानापुरात फूटपाथवर अतिक्रमण

Amit Kulkarni