Tarun Bharat

अलाउलात पर्यटकांना मिळणार प्रवेश

Advertisements

सौदी अरेबियाचे पर्यटकांना आमंत्रण

कोविड संकट निवळल्यावर भारतीयांनाच मिळणार व्हिसा

सौदी अरेबिया स्वतःचे कित्येक शतके जुने शहर असलेल्या अलाउलामध्ये पुन्हा पर्यटकांना आमंत्रित करत आहे. रॉयल कमिशन फॉर अलाउलाने (आरसीयू) शहरातील प्राचीन ठेव्याचे दर्शन आणि एक वेगळा अनुभव प्राप्त करण्यासाठी भारतीय पर्यटकांना आमंत्रित केले आहे. कोविडविषयक निर्बंध समाप्त होताच भारतीय पर्यटक सहजपणे अलाउला येथे जाऊ शकतील. अमेरिका, ब्रिटन, शेनेगन इत्यादींचा व्हिसा बाळगणारे भारतीय व्हिसा ऑन अरायव्हल आणि अन्य निश्चित प्रक्रियेतून व्हिसा मिळवून अलाएला येथे जाऊ शकतील.

अलाउला सौदी अरेबियाच्या प्राचीन क्षेत्रांपैकी एक आहे. तेथे हजारो वर्षे जुने मकबरे आणि अन्य ऐतिहासिक स्थळे आहेत. या सर्व ठिकाणांना नव्या स्वरुपात जगासमोर सादर करण्यात आले आहे. सौदी अरेबियाकडे एक प्रमुख धार्मिक स्थळ म्हणून पाहिले जाते. पण आता अन्य स्थळे देखील खुली केली जात आहेत अशी माहिती आरसीयूच्या कार्यकारी संचालिका मेलिनी डी-सूजा यांनी दिली आहे.

अलाउला एक लिव्हिंग म्युझियम असून तेथे 2 लाख वर्षांपूर्वीची प्रतीकं दिसून येतील. आरसीयूने भारतात स्वतपःचे प्रतिनिधी नियुक्त केले आहेत. भारतीय पर्यटकांसमोर एक नवे आणि वेगळे ठिकाण म्हणून याचे सादरीकरण केले जाणार आहे. येथे प्राचीन नाबेटियन साम्राज्याचे प्रमुख शहर हेगरासह अन्य अनेक स्थळे देखील असल्याचे त्या म्हणाल्या.

अलाउला ड्रीम प्रोजेक्ट

सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी द जर्नी थ्रू टाइम प्रकल्पाच्या अंतर्गत ऐतिहासिक शहर अलाउला विकसित करण्यासाठी एक मास्टर प्लॅन सादर केला आहे. या प्रकल्पात संस्कृती, वारसा, निसर्ग आणि समुदायाला एकत्र आणले गेले आहे. हा प्रकल्प सौदी अरेबियाच्या व्हिजन 2030 अंतर्गत एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

Related Stories

तालिबानकडून घराघरातून मुलींचा शोध

Patil_p

चंद्रावर चीनने फडकविला झेंडा

Patil_p

अमेरिकेत बाधितांची संख्या 1.5 कोटींच्या उंबरठ्यावर

datta jadhav

पाकिस्तान ग्रे लिस्टमध्येच; एफएटीएफचा निर्णय

datta jadhav

हिटलरपासून वाचला, पुतीनमुळे मारला गेला

Patil_p

पांढऱया केसांची महिला इंटरनेटवर व्हायरल

Patil_p
error: Content is protected !!