सैफ अली खान आणि तब्बू यांच्यासोबतच्या जवानी जानेमन या चित्रपटातून धमाकेदार पदार्पण करणारी अलाया फर्निचरवाला सध्या चित्रिकिरणात व्यस्त आहे. एकता कपूरच्या नव्या चित्रपटातून ती दिसून येणार आहे. या चित्रपटाच्या चित्रिकरणाकरता ती सध्या चंदीगडमध्ये आहे.
चंदीगडमधील स्ट्रीटफुड अनुभवण्याची अलायाची इच्छा आहे. मी जवळपास एक महिन्यापासून चंदीगडमध्ये आहे, निर्बंधांमुळे आम्ही शक्य तितका वेळ आनंद लुटत आहोत असे ती सांगते. अलाया ही अभिनेत्री पूजा बेदी यांची मुलगी आहे.


चित्रिकरण संपताच आम्ही स्ट्रीटफुड खाण्यासाठी बाहेर पडू. येथील खाद्यसंस्कृतीविषयी बरेच काही ऐकले आहे. येथील स्थानिक शाकाहारी खाद्यपदार्थ छोले कुलचे, गोल गप्पे (पाणीपुरी), लस्सी आणि अन्य गोष्टींची चव चाखू इच्छिते. मी अलिकडेच शाकाहारी झाल्याचे तिने म्हटले आहे.
यू-टर्न या चित्रपटाच्या रिमेकमध्ये अलाया कारम आहे. चित्रपटाचे चित्रिकण्रा ऑगस्टच्या अखेरपर्यंत संपण्याची अपेक्षा आहे. याचबरोबर तिच्याकडे अनेक चित्रपटांचे प्रस्ताव आहेत. तिला यापूर्वी सजेया या म्युझिक व्हिडिओमध्ये पाहिले गेले होते.