Tarun Bharat

अलास्कात सलग दोन वेळा भूकंपाचे तीव्र धक्के; त्सुनामीचा इशारा

ऑनलाईन टीम / अलास्का : 

अमेरिकेच्या अलास्कामध्ये आज सकाळी 6.12 मिनिटांनी सलग दोन वेळा भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. पहिल्या भूकंपाची तीव्रता 7.8 रिश्टर स्केल तर दुसऱ्या भूकंपाची तीव्रता 6.1 रिश्टर स्केल एवढी होती. सुदैवाने यात कोणत्याही जीवित अथवा वित्त हानीचे वृत्त नाही. मात्र, या भूकंपाच्या केंद्रबिंदूपासून 300 किमीच्या अंतरावर त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.

एंकरेजच्या दक्षिण -पश्चिम 500 किमीपासून ते पॅरिव्हिले दक्षिण 60 किमीपर्यंत या भूकंपाची तीव्रता जाणवली. भूकंपानंतर लगेच दक्षिण अलास्का आणि अलास्का द्वीपकल्पासाठी त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. यूएसजीएसच्या मते, भूकंपाची तीव्रता जास्त असल्यास त्सुनामी येण्याची शक्यता असते. 

त्सुनामीच्या इशाऱ्यानंतर राज्यात अलर्ट जारी करण्यात आला असून, प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. 

Related Stories

Election 2022 : राज्य सरकारचा निर्णय: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2017 प्रमाणेच

Abhijeet Khandekar

दिल्ली : बत्रा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन अभावी एका डॉक्टरसह आठ जणांचा मृत्यू

Tousif Mujawar

‘इथेनॉल’बाबत पेट्रोलियम मंत्र्यांशी बोलून मार्ग काढू

Archana Banage

पंतप्रधान मोदींनी फोनवरून केली मिल्खा सिंग यांच्या प्रकृतीची चौकशी

Archana Banage

अफगाणिस्तानमध्ये आत्मघाती स्फोट; जवळपास 43 जण जखमी

Tousif Mujawar

मिरजेत पोलिसाला साडेसात लाखांचा ऑनलाईन गंडा

Archana Banage