Tarun Bharat

अल्पवयीन मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

प्रतिनिधी / सातारा :

मंगळवार पेठ येथे राहणाऱ्या अल्पवयीन मुलाने मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात डॉक्टरांच्या एमएलसीवरून करण्यात आली आहे.

याबाबत पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दि. 28 रोजी रात्री 12 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास मंगळवार पेठेत राहणारा अल्पवयीन मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत कुटुंबातील सदस्यांना आढळून आला. यावेळी कुटुंबातील सदस्यांनी त्याला जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नातेवाईकांनी केलेली नाही. परंतु पोलिसांनी डॉक्टरांच्या एमएलसीवरून आत्महत्येची नोंद केली आहे.

Related Stories

मेडिकल कॉलेजसाठी जिल्हा बँकेचा हातभार

Patil_p

नागरिकत्व विरोधात साताऱयात भव्य मोर्चा

Patil_p

ग्रंथ हे जगण्याची भाकरी देतात

Patil_p

सेनॉर चौकास हिंदूसुर्य महाराणा प्रताप यांचे नाव द्या

Amit Kulkarni

आमदार निलंबनावर सातारा जिल्हा भाजप आक्रमक

Patil_p

आता चाखायला मिळणार गोकुळची सुगंधी बासुंदी

Archana Banage