Tarun Bharat

अल्पवयीन मुलीचा खून करणाऱया नराधमांना फाशी द्या

बंजारा समाजाचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन

प्रतिनिधी/ बेळगाव

बळ्ळारी जिह्यातील बस्सापूर या गावातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करण्यात आला आहे. या प्रकरणातील एका आरोपीला अटक केली असली तरी या प्रकरणात अनेक जण सामील आहेत. त्यांनाही अटक करून या सर्वांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी अखिल कर्नाटक बंजारा समाजाच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाव्दारे करण्यात आली.

देशामध्ये अल्पवयीन मुली तसेच तरुणींवर अन्याय होण्याच्या घटना वाढल्या आहेत. अशा घटना वाढत राहिल्यास महिलांचे जीवन असुरक्षित होणार आहे. तेंव्हा अशा घटनांमधील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होणे महत्त्वाचे आहे. केवळ अटक करून चालणार नाही तर अशा नराधमांना फाशीसारखी शिक्षा होणे गरजेचे आहे, असे या निवेदनात नमूद करण्यात आले.

बळ्ळारी जिह्यातील होसपेट तालुक्मयातील बस्सापूर या गावामध्ये घडलेल्या या घटनेमुळे महिलांमध्ये भितीचे वातावरण परसले आहे. मागासवर्गीय तसेच दीनदलितांवर अन्याय वाढत चालले आहेत. तेंव्हा त्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शिक्षा करावी, अशी मागणी करण्यात आली. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवानंद चव्हाण, मंजुनाथ बसमूर, संतोष राठोड, सुरेश पायजो, रामाजी चव्हाण, सुरेश राठोड, गोपी लमाणी, मारुती लमाणी, सोमू लमाणी यांच्यासह बंजारा समाजातील नागरिक उपस्थित होते..

Related Stories

युवा समितीच्या सामान्यज्ञान स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Patil_p

कॅम्प येथील हेस्कॉमच्या कामाची आमदारांकडून पाहणी

Amit Kulkarni

जिल्हय़ातील 32 जण झाले कोरोनामुक्त

Amit Kulkarni

तळागळापर्यंत राज्यघटना पोहचली तरच सामाजिक विषमता दूर होईल

Patil_p

विकेंड लॉकडाऊन काळात बँका बंद; एटीएम सुरू

Amit Kulkarni

बळ्ळारी नाल्यात ड्रेनेजचे पाणी, पावसाळय़ात होणार गंभीर परिस्थिती

Tousif Mujawar