Tarun Bharat

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवल्याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल

प्रतिनिधी / नागठाणे

शेळकेवाडी ता.सातारा येथील अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुलीच्या वडिलांनी हि फिर्याद दाखल केली आहे.

गुरुवारी रात्री घरातील सर्व जेवण करून झोपले.रात्री उशिरा मुलीची आई उठली असता घरात अल्पवयीन मुलगी नसल्याचे निदर्शनास आले.मुलीच्या कुटुंबीयांनी परिसरात सर्वत्र शोध घेऊनही ती न सापडल्याने शुक्रवारी त्यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल केला.पुढील तपास हवालदार बाबा महाडिक करत आहेत.

Related Stories

कोरोना उंबरठ्याबाहेरच रहावा

datta jadhav

भाजप नेत्या सोनाली फोगट यांचे गोव्यात निधन

Abhijeet Khandekar

‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेतील पंचांना धमकीचा फाेन

datta jadhav

…तर मी हेलिकॉप्टरने कन्याकुमारीला गेलो असतो; राहुल गांधींची खोचक टीका

Archana Banage

सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा ७ वर

Archana Banage

प्रसाद कोंडे यांच्या वाहनावर गोळीबार

Patil_p