Tarun Bharat

अल्पवयीन युवतीवर अत्याचार; सावत्र पित्यास अटक

प्रतिनिधी/ सातारा

वाई शहरात एका 17 वर्ष 7 महिन्याच्या मुलीवर सावत्र पित्यानेच अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी गुन्हा दाखल होताच क्षणाचा विलंब न लावता सावत्र पित्यास अटक केली आहे.

याबाबत वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पिडीत युवतीने दिलेल्या फिर्यादीनुसार ती व तिची आई या दोघी भाडय़ाच्या खोलीत राहतात. तेथे तिचा सावत्र वडिल हा आई घरात नसताना 2016 पासून ते दि. 9 एप्रिल 2022 पर्यंत यायचा अन् बळजबरीने अत्याचार करुन कोणाला काही सांगितल्यास तर जीवे मारण्याची धमकी द्यायचा. याबाबतची फिर्याद पीडित मुलीने वाई पोलीस ठाण्यात दाखल करताच हे प्रकरण गंभीर असल्याची बाब निदर्शनास येताच वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी संबंधित संशयित सावत्र पित्यास अटक करण्याच्या सूचना दिल्या. त्यास रात्री 9.22 वाजता अटक करण्यात आली आहे. त्याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहल सोमदे या करत आहेत.

Related Stories

सांगली जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा खुली घेण्यासाठी परवानगी

Archana Banage

CBSE Board 12th Result : आज दुपारी २ वाजता जाहीर होणार निकाल

Archana Banage

दहशत माजवणारे बकासूर गँगचे 6 जण जेरबंद

Patil_p

सातारा : कर्मवीर पुण्यतिथी कार्यक्रम रद्द

datta jadhav

शिवशक्ती- भीमशक्ती युतीसाठी वंचितचा होकार

Abhijeet Khandekar

गुणवरे येथे 1500वृक्ष लागवडीचा उपक्रम

Patil_p
error: Content is protected !!