Tarun Bharat

अवंतीपोरा चकमकीत दहशतवाद्याला कंठस्नान

ऑनलाईन टीम / श्रीनगर :

जम्मू-काश्मीरच्या अवंतीपोरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाद्वारे ही कारवाई करण्यात येत असून, एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात या पथकाला यश आले आहे. ठार झालेल्या दहशतवाद्याची ओळख अद्याप पटली नाहे.

अवंतीपोराच्या बारागाम भागात दहशतवादी लपल्याचे इनपुट्स पोलिसांना मिळाले होते. त्याआधारे पोलीस आणि सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने या भागात शोध मोहीम सुरू केली होती. भागात सुरक्षा दलांचा वेढा घट्ट होताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना अनेकदा शरण जाण्याची संधीही दिली, त्याकडे दहशतवाद्यांनी दुर्लक्ष केले. दरम्यान, सुरक्षा दलानेही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले. या भागात अद्याप चकमक सुरू आहे.

Related Stories

मंदिरासाठी मुस्लीम कुटुंबाने दान केली अडीच कोटींची जमीन

Abhijeet Khandekar

आंध्रात बस अपघातात सात वऱहाडींचा मृत्यू

Patil_p

उध्दव ठाकरे शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहतील, येणारा काळ शिवसेनेचाचं- संजय राऊत

Abhijeet Khandekar

शेअर बाजारात ‘कोरोना इफेक्ट’

Patil_p

शालेय शिक्षण मातृभाषेतूनच द्या; केंद्र सरकारची ठाम भूमिका

datta jadhav

दिल्लीत आज दिवसभरात आढळले 1195 नवे कोरोना रुग्ण

Tousif Mujawar