रब्बी ज्वारी,ऊस भुईसपाट. पंचनामे करण्याची शेतकयांची मागणी
वार्ताहर / औंध
औंध परिसरात झालेल्या धुव्वाधार अवकाळी पाऊसाने ऊस, रब्बी हंगामातील ज्वारीसह पिके भूईसपाट झाल्यामुळे शेतकयांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकयांनी केली आहे.
दोन दिवस आभाळ येत असले तरी काल सायंकाळी वायासह झालेल्या अवकाळीच्या धुव्वाधार पाऊसाने रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा आणि ऊसाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ऊसाला तुरे आले आहेत आणि उसतोड मिळत नसल्याने अगोदरच शेतकरी चिंतेत होता. त्यातच अवकाळीच्या दणक्यात ऊस पडल्याने उत्पन्नात घट होणार आहे. तसेच उंदीर, कोह्याचा देखील प्रादुर्भाव वाढणार आहे. रब्बी हंगामातील ज्वारी गहू हरभरा पिके देखील जोमात आहेत. सोसाटय़ाचा वारा आणि पाऊसामुळे हातातोंडाशी आलेले ज्वारीचे पिक जमिनीवर लोळले आहे. पिके भुईसपाट झाल्याने शेतकयांवर आसमानी संकट कोसळले आहे. औंधसह पुसेसावळी परीसरात नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून शासनाने पंचनामे करावेत अशी मागणी शेतकयांनी केली आहे.
कोरोनासारख्या नैसर्गिक आपत्तीने शेतकयांची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. अवकाळीच्या आसमानी संकटामुळे रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाल्याने उत्पादन घटणार आहे. सरकारने नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून पंचनामे करावेत आणि भरपाई देऊन शेतकयांना दिलासा द्यावा.