Tarun Bharat

अवरादी येथे साडेतीन किलो गांजा जप्त

Advertisements

डीसीआरबीची कारवाई, एकाला अटक

प्रतिनिधी / बेळगाव

कित्तूर जवळील अवरादी येथे साडेतीन किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. गुरुवारी डीसीआरबीच्या अधिकाऱयांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणी त्याच गावातील एका रहिवाशाला अटक करण्यात आली आहे.

सोमाप्पा बसाप्पा पुरद (वय 53) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. डीसीआरबीचे पोलीस निरीक्षक निंगनगौडा पाटील, डी. के. पाटील, टी. के. कोळची, एस. एम. मंगण्णावर, जयराम हामण्णावर, एम. आय. पठाण आदींनी ही कारवाई केली.

कित्तूर पोलीस स्थानकात यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अवरादी येथील सोमाप्पाने गांजाचा साठा करुन ठेवल्याची माहिती मिळताच अचानक छापा टाकून त्याला अटक करण्यात आली. जप्त गांजाची किंमत 52 हजार 500 रुपये इतकी आहे. कित्तूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

जीएसएस कॉलेजमध्ये श्रुजन विज्ञान महोत्सव

Amit Kulkarni

तालुक्यातील एकही गाव पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवणार नाही!

Amit Kulkarni

कार्बोव्हॅक्स लसीकरणाला प्रारंभ

Amit Kulkarni

युवासेनेच्या कार्याची प्रशंसा

Amit Kulkarni

सिग्नेचर क्लब, सीसीआय ब संघ विजयी

Amit Kulkarni

पै.नागराज बसीडोनीकडून पै.संतोष पडोलकर चितपट

Amit Kulkarni
error: Content is protected !!