Tarun Bharat

अविनाश मोहितेंसह 23 जणांचे अर्ज दाखल

Advertisements

प्रतिनिधी / कराड

रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखान्यासाठी गुरूवारी संस्थापक पॅनेलचे प्रमुख, कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्यासह 23 जणांनी अर्ज दाखल केले. त्यात दोन विद्यमान संचालकांचाही समावेश आहे. दिवसभरात तब्बल 120 अर्जांची विक्री झाली आहे. आजअखेर 247 अर्जांची विक्री झाली आहे. 

कारखान्याच्या अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशी विद्यमान संचालकांसह सहा जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यानंतर आज अर्ज पुन्हा 23 अर्ज दाखल झाले आहेत. आता अर्ज भरण्यास मोजकेच तीन दिवस शिल्लक आहेत. त्यात उद्या (शुक्रवार), सोमवार व मंगळवार असे दिवस आहेत. आजच्या दिवशी कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी रेठरे बुद्रुक-शेणोली गटातून अर्ज भरला आहे. त्यांच्या मातोश्री नूतन मोहिते यांनीही त्याच गटासह महिला राखीवमधून अर्ज भरला आहे. त्याशिवाय शिवाजी आवळे (शिरटे) या विद्यमान संचलकांनाही अर्ज भरला आहे. महिला राखीव डबल अर्ज भरले आहेत. 

गटनिहाय भरलेले अर्ज असे : वडगाव हवेली – दुशेरे गट : उत्तम विष्णू खबाले, उत्तम तुकाराम पाटील. काले-कार्वे गट : अमरसिंह बाळासाहेब थोरात, विजय निवृत्ती पाटील. रेठरे हरणाक्ष-बोरगाव गट : जयवंत दत्तात्रय मोरे, शिवाजी आप्पासाहेब पवार, संभाजी भगवान दमामे, मिनाक्षीदेवी संभाजी दमामे, मानाजी प्रल्हाद पाटील, पोपट रंगराव थोरात. येडेमच्छिंद्र-वांगी गट : बाबासाहेब वसंतराव पाटील. रेठरेबुद्रुक शेणोली गट : अविनाश जगन्नाथ मोहिते, नूतन जगन्नाथ मोहिते. अनुसूचित जाती जमाती राखीव : शिवाजी उमाजी आवळे, बाजीराव आबा वाघमारे. महिला राखीव गट : नूतन जगन्नाथ मोहिते, अर्चना अविनाश मोहिते, क्रांती तानाजी पाटील, मिनाक्षीदेवी संभाजी दमामे. इतर मागासप्रवर्ग गट : वसंतराव बाबुराव शिंदे. वीजा, भज. राखीव गट : अमोल काकडे.

विरोधी पॅनेलची खलबते सुरूच

कारखान्याच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी डॉ. सुरेश भोसले यांच्या पॅनेलविरोधात माजी अध्यक्ष इंद्रजित मोहिते आणि अविनाश मोहिते यांच्या एकत्रिकरणाचे प्रयत्न सुरूच आहेत. विश्रामगृहावर रात्री माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राज्यमंत्री विश्वजित कदम, युवा नेते ऍड. उदयसिंह पाटील यांची खलबते सुरू होती. बुधवारी रात्रीही उशिरापर्यंत बैठक झाली. आजही बैठक सुरू होती. विरोधी पॅनेलचे चित्र दोन दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Related Stories

आरोग्य उपसंचालकांनी घेतला आढावा

Patil_p

साताऱ्यात 1 ते 31 डिसेंबर कालावधीत क्षय रोग आणि कुष्ठ रोग रुग्ण शोध मोहिम

Abhijeet Shinde

जावळीकर अभियंता सचिनच्या प्रतीक्षेत

datta jadhav

साताऱ्यामध्ये पुन्हा ‘रोल, कॅमेरा, अॅक्शन

Abhijeet Shinde

सातारच्या ‘हिरकणी’ने नोंदवला अनोखा विक्रम

Patil_p

ताल सुरांच्या धारांनी रसिक झाले चिंबचिंब

Omkar B
error: Content is protected !!