Tarun Bharat

अवैधरित्या दारूविक्री करताना एकजण ताब्यात

प्रतिनिधी / नागठाणे : 

काशीळ (ता.सातारा) येथून चारचाकी वाहनातून दारू विक्री करत असताना बोरगाव पोलिसांनी एकास ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून देशी दारूसह एक मारुती कार असा १ लाख ८१ हजाराचा माल जप्त करण्यात आला.

संशयित केशवराज शिवलाल भंडारी (वय.३३, मूळ.रा.विनई त्रिवेणी, गाव पंचायत नवलपूर, नेपाळ, सध्या रा.काशीळ ता.जि. सातारा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.       

बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी ९ च्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर, हवालदार विजय साळुंखे, डी. व्ही.जाधव तसेच होमगार्ड लोहार हे काशीळ येथे पेट्रोलिंग करत असताना काशीळ ते पाली जाणाऱ्या राज्यमार्गावर मनाली बारचे मागील बाजूस सुझुकी एक कार उभी असल्याचे दिसून आले. सदर गाडीमधील असलेल्या इसमाच्या हालचाली संशयास्पद असल्याने त्याच्याकडे विचारपूस केली. त्याने सुरुवातीला टाळाटाळ करून उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी विश्वासात घेऊन विचारले असता त्याने गाडीत देशी दारूच्या बाटल्या असल्याचे कबूल केले. विनापरवाना देशी दारू बाळगल्याबद्दल त्याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार विजय साळुंखे करत आहेत.

Related Stories

‘तोक्ते’ चक्रीवादळामुळे जिल्ह्यात नुकसान

datta jadhav

प्रजासत्ताक ा†दनाच्या पूर्वसंध्येला ग्रेड सेपरेटरच्याद्वारांना येणार झळाळी

Patil_p

गळती लागल्याने शहरातील काही भागास दि.1 रोजी पाणी येणार नाही

Amit Kulkarni

शिवसमर्थ प्रेरणा दिवसाची प्रथा अखंडीत

datta jadhav

सातारा जिल्हा परिषदेमध्ये लसीकरण झालेल्याच नागरिकांना प्रवेश

Amit Kulkarni

शाहूनगरी झाली भीममय

Omkar B