Tarun Bharat

अवैध अर्ज झाला वैध

जिल्हा बँक निवडणूक

प्रतिनिधी/ सातारा

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अर्ज छाननीत भटक्या जाती, भटक्या जमाती व विशेष मागासवर्ग प्रवर्गातून उमेदवार अर्ज दाखल केलेल्या लोणंदच्या शिवाजीराव शंकरराव शेळके-पाटील यांचा अर्ज संस्था थकबाकीदार असल्याने अवैध ठरवण्यात आला होता. त्यावर पाटील यांनी दाखल केलेल्या अपिलावर सहकारी संस्था कोल्हापूर विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांनी त्यांचे अपिल ग्राहय़ धरुन त्यांचा अर्ज वैध ठरवत बँकेच्या पात्र उमेदवार यादीत त्यांचे नाव समाविष्ट करण्याचा आदेश दिला आहे.

याबाबत शेळके-पाटील यांचे वकील ऍड. तुषार यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार संस्था थकबाकीदार असल्याचे नमूद करत शेळके-पाटील यांचा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अर्ज नामंजूर केला होता. यावर शेळके-पाटील यांनी कोल्हापूर विभागीय सहकारी संस्था सह निबंधकांकडे अपील दाखल केले होते.  शेळके-पाटील यांच्यावतीने ऍड. यादव यांनी या सुनावणीत काम पाहिले.

दि. 25 रोजी शेळके-पाटील यांचा अर्ज नामंजूर केला त्यावेळीच शेळके-पाटील  पाटील यांनी लोणंद सोसायटीत तत्पूर्वी पैसे भरले होते. त्याबाबतचे नो डयुज सर्टिफिकेटही त्यांच्याकडे होते. मात्र, त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधीही विहित मुदतीत दिली गेली नव्हती. त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आल्याने त्यांनी विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांच्याकडे अपिल दाखल केले.

काकडे यांच्यासमोर शेळके-पाटील यांनी ते थकबाकीदार नसल्याचे व बँकेनेही नो डय़ुज सर्टिफिकेट दिले असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यांना विहित मुदतीत खंडण करण्याची संधी न देता त्यांचा अर्ज अवैध ठरवला असल्याने त्यांचा अर्ज वैध ठरवण्याची विनंती केली होती. त्यावर काकडे यांनी सर्व बाजू अवलोकन केल्यावर पात्र उमेदवारांच्या यादीत त्यांचे नाव समाविष्ट करण्याचे आदेश दिल्याने शेळके-पाटील यांचा अर्ज वैध ठरला आहे.

Related Stories

दिल्लीतील स्फोटाच्या पार्श्वभूमीवर मंबई, पुण्यासह राज्यातील सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्याचे निर्देश

Tousif Mujawar

साताऱयात दुकानदाराचा निघृण खून

Patil_p

अनिल देशमुख आज देखील ईडी कार्यालयात गैरहजर, वकील म्हणाले…

Tousif Mujawar

चाफळला फौजदाराची खुर्ची रिकामी

datta jadhav

महावितरणची आर्थिक कोंडी; जिह्याची थकबाकी 995 कोटींवर

Omkar B

राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी संमिद्राताई जाधव यांची वर्णी

Patil_p