Tarun Bharat

अवैध दारु विकणाऱया नऊजणांवर कारवाई

प्रतिनिधी/ सातारा

जिल्हय़ात धुलवडी दिवशी अवैध दारु विक्री करणाऱया नऊजणांवर विविध ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्या ताब्यातील 8 हजार 500 रुपयांच्या देशी दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये काही फरारी झाले असून काहींना सीआरपीसीअन्वये नोटीसा बजावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

यामध्ये रहिमतपूर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱयांनी शिरंबे, ता. कोरेगाव येथे अवैध दारु विकणाऱया राहूल प्रकाश सुतार (वय 24, रा. शिरंबे) याच्यावर कारवाई केली. त्याच्या ताब्यातील 988 रुपयांच्या देशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या. तर पाटण पोलिसांनी नाटोशी येथे नवनाथ काशीनाथ भिसे  (वय 26, रा. नाटोशी) याच्यावर कारवाई करत 844 रुपयांची दारु जप्त केली.

तळबीड पोलिसांनी बेलवडे हवेली, ता. कराड येथे विजय हरिबा जाधव  (वय 42) याच्यावर कारवाई करुन त्याच्याकडील 364 रुपयांची देशी दारु जप्त केली. तर साताऱयात शाहूपुरी पोलिसांनी बोगदा परिसरात विशाल बाळू चौगुले  (वय 36 रा. मंगळवार पेठ, सातारा) याच्यावर कारवाई करुन त्याच्याकडील 1 हजार 352 रुपयांची दारु जप्त केली.

सातारा शहर पोलिसांनी गोडोलीतील अंजठा चौक परिसरातील गोपाळवस्तीवर हिराबाई राजाराम निंबाळकर  (वय 72) या महिलेवर कारवाई करत तिच्याकडील 754 रुपयांच्या देशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या. कराड तालुका पोलिसांनी नारायणवाडीत दारु विकणाऱया जगन्नाथ महादेव जाधव  (रा. आटके) याच्यावर कारवाई त्यच्याकडून 1 हजार 560 रुपयांच्या देशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.

दहिवडी पोलिसांनी लोथवडे, ता. माण येथे मैनाबाई संजय तळेकर (वय 45) हिच्यावर कारवाई करत तिच्या ताब्यातील 1 हजार 114 रुपयांच्या देशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या असून उंब्रज पोलिसांनी कालगाव, ता. कराड येथे विकास जयवंत चव्हाण याच्यावर कारवाई करत त्याच्याकडील 776 रुपयांची देशी दारु जप्त केली. पुसेगाव पोलिसांनी रणसिंगवाडी, ता. खटाव येथे संजय रामचंद्र जाधव  (वय 39, रा. शिरवली, ता. माण) याच्यावर कारवाई करत त्याच्याकडील 832 रुपयांची देशी दारु जप्त केली. यातील काही फरारी झाले तर काहींवर सीआरपीसी अन्यवे नोटीसा बजावण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले.

Related Stories

रास्त भाव दुकांनाची आय.एस.ओ मानांकन तयारी अंतिम टप्प्यात

datta jadhav

50 टक्के कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलवा : शासनाचे आदेश

Tousif Mujawar

”नवनीत राणा यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि अभिनय क्षेत्रात पुन्हा नशीब आजमावून पाहावं”

Archana Banage

कोल्हापूर : उजळाईवाडी जवळील अपघातात एक ठार

Archana Banage

जळगाव हादरले! एकाच घरातील चार मुलांची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या

Tousif Mujawar

लाच घेताना तलाठय़ासह दोघे जाळय़ात

Patil_p