असळज / प्रतिनिधी
असळज परिसरात अवैध दारू विक्री जोमात असून पोलिस यंत्रणेने गांधारीचे रूप धारण केले आहे.त्यातच अति मद्य प्राशन केलेने खोकुर्ले येथे एकाचा मृत्यू झाला असून संतप्त ग्रामस्थांनी पोलिस यंत्रणेविषयी असंतोष व्यक्त केला आहे.गगनबावडा तालुक्यातील असळज बाजारपेठ व आजूबाजूच्या प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात दारू विक्री जोमात असून पोलिस यंत्रणा मात्र आम्हाला काहीच माहितच नाही असा आव आणत आल्याचे चित्र निर्माण केले आहे.असळज परिसरातील अन्य गावातील ग्रामस्थांनी पोलिस यंत्रणेला अनेक वेळा कल्पना देवूनही कधी कधी छापे मारीचा दिखावा केला जात असल्याचे नागरिकात चर्चेला असते.त्याशिवाय दारू विक्रीते व पोलिस यंत्रणा यांच्या सलगीचे व पार्ट्यांचे कारनामे नागरिकात चर्चेले जात आहेत.दारू विक्रेते पोलिस यंत्रणेला काही मलई देतात का ? या प्रश्नाचे उत्तर देताना दारू विक्रेतांचे ऑडीओ हि नागरिकांनी केले असल्याच्या चर्चा ऐकावयास मिळतात. आता काही दिवसात दिवाळी जवळ आल्याने दुध व्यवसायांना दुध संस्थेतून बोनस मिळणार आहेत.दारूच्या या अवैध विक्रीने अनेकांचे संसार वाऱ्यावर पडणार आहेत.त्याशिवाय पोलिस यंत्रणेच्या या निष्काळजी पणाने एका ग्रामपंचायतीने याबाबत पोलिस यंत्रणेला जागे करण्यासाठी निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे.पोलिस यंत्रणेने या विषयी वेळीच आळा घालावा अन्यथा महिलांचा मोठा आक्रोश होण्यास वेळ लागणार नसल्याचे मत खोकुर्ले च्य नागरिकांनी दै.तरुण भारत शी बोलताना व्यक्त केले.


previous post