Tarun Bharat

अवैध दारू साठ्याप्रकरणी एकावर गुन्हा

प्रतिनिधी / नागठाणे :  

नागठाणे (ता.सातारा) येथे मंगळवारी आढळलेल्या अवैध दारूसाठ्याप्रकरणी बोरगाव पोलिसांनी येथीलच एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अविनाश अरविंद साळुंखे (रा.नागठाणे, ता.सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 10 हजार रुपये किंमतीची देशी दारू जप्त केली आहे.        

मंगळवारी सकाळी नागठाणे येथे मालन गायकवाड या महिलेचा तिचा पती बबन गायकवाड याने लाकडी दांडक्याने मारहाण केल्याने मृत्यू झाला होता. याबाबत बोरगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यांचा तपास करत असताना बोरगाव पोलिसांना मृताच्या घरात पत्र्याची नवी पेटी कुलूपबंद स्थितीत आढळली होती. संशयावरून या पेटीची तपासणी केली असता त्यामध्ये 90 मिलीच्या देशी दारूच्या 300 बाटल्या असलेली तीन बॉक्स निदर्शनास आले.       

याबाबत संशयित पती बबन गायकवाड याच्याकडे विचारणा केली असता संबंधित पेटी व दारूचे बॉक्स हे नागठाणे येथील अविनाश अरविंद साळुंखे याचे असल्याचे व ही दारू विक्रीसाठी येथे ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला असून अविनाश साळुंखे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हवालदार रामचंद्र फरांदे करत आहेत.

Related Stories

शस्त्रक्रिया विभाग प्रमुखपदी डॉ. जगदाळे रूजू

Patil_p

शिक्षक बँकेसह जिह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित

Patil_p

बामणोली, तापोळा बोटींगसह वासोटा पर्यटन झाले सुरु

Archana Banage

स्पुटनिक व्ही लस 20 दिवसांपासून आलीच नाही

Patil_p

काटेकोर पद्धतीने शेती ही काळाची गरज – कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम

Archana Banage

सातारा : जिल्ह्यात 396 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 8 नागरिकांचा मृत्यू

Archana Banage
error: Content is protected !!