Tarun Bharat

अवैध माती उत्खनन प्रकरणी चाळीस लाखांचा ऐवज जप्त

तहसीलदार किरण जमदाडे यांची धडक कारवाई ; कलेढोण परिसरात शेतकऱयांकडून अवैध उत्खनन  

वार्ताहर,/ मायणी

कलेढोण (ता.खटाव) येथील मल्हारपेठ पंढरपूर महामार्गालगत शुक्रवारी मुळीकवाडी येथील शेतकरी अवैधरित्या माती उत्खनन करीत आहे. त्याबाबतची माहिती खटाव तालुक्याचे तहीलदार किरण जमदाडे यांनी मिळाली. त्यांनी तत्काळ प्रशासनाचे कर्मचारी मदतीला घेऊन धडक कारवाई करीत अंदाजे चाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त करत कारवाई केली. त्यामुळे ऐवध उत्खनन करणारांचे धाबे दणाणले असून पाळापळी झाली आहे. 

याबाबत महसूल विभागाकडून मिळालेली माहिती अशी, विनापरवाना अनिकृतरीत्या मातीचे उत्खनन करण्यात येत असल्याची गोपनीय माहिती खटाव तालुक्याचे तहसीलदार किरण जमदाडे यांना मिळाली. त्यांनी तातडीने याठिकाणी छापा टाकीत कलेढोन हद्दीत गट क्र.3285,3284 मध्ये अनधिकृत माती उत्खनन करणारे विखले येथील पोकलेन मिशन ताब्यात घेतले. तसेच उत्खनन करण्यात आलेला अंदाजे आठशे ब्रास मातीचा ढीग अधोरेखित करण्यात आला आहे. असा एकूण चाळीस लाख रक्कमेची कारवाई करण्यात आल्याची माहिती तहसीलदार जमदाडे यांनी दिली.

 या कारवाई कलेढोणचे तलाठी योगेश परदेशी, तलाठी विखळे गोपाळराव बिडकर, तलाठी तरसवाडी प्रकाश मोहिते, कोतवाल प्रवीण बुधावले, पोलीस पाटील प्रशांत कोळी, पोलीस कर्मचारी हवालदार नाना कारंडे, पोलीस नाईक प्रवीण सानप, पोलीस कॉन्स्टेबल बापू शिंदे आदींचा समावेश होता. या कारवाईबद्दल खटाव तालुक्याचे तहसीलदार किरण जमदाडे यांचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी कौतुक केले.

Related Stories

Satara : खंबाटकी घाटात बर्निंग कंटेनरचा थरार; वाहतूक ठप्प

Abhijeet Khandekar

कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्या वतीने कमला देवी चरणी चांदीची तलवार अर्पण

Archana Banage

सातारा : मृत भ्रृण बाहेर काढणाऱ्या ‘त्या’ कर्मचाऱ्यास केले आत्महत्येपासून परावृत्त

Archana Banage

जिल्हा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी

datta jadhav

कराड शहरात 34 मायक्रो कंटेनमेंट झोन

Amit Kulkarni

मुख्याधिकारी केबीनसमोर नगरसेवकाने ओतले बादलीभर पाणी

Patil_p