Tarun Bharat

अवैध वाळू वाहतूक प्रकरणी महसूल विभाग अ‍ॅक्शन मोडमध्ये

Advertisements

भगवंतगड व तेरई नदीकाठावरील वाळू रॅम्प तोडले

अवैध वाळू वाहतूक करणारे तीन डंपर पकडले

आचरा /प्रतिनिधी-

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांविरोधात महसूल विभागाने धडक कारवाई सुरू केली आहे. शुक्रवारी रात्री आचरा मंडळ पथक आणि महसूल भरारी पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत तीन डंपर पकडून आचरा पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत.
अवैध वाळू वाहतूकीविरोधात वाढत्या तक्रारी मुळे महसूल विभागाने अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्याविरोधात कारवाई सुरू केली आहे. शनिवारी दुपारी चिंदर भगवंतगड व तेरई येथील वाळू उपसा करण्यासाठी वापरण्यात येणारे रॅम्प महसूल विभागाने उध्वस्त करत कारवाई केली


प्रांताधिकारी वंदना खरमाळे तहसीलदार अजय पाटणे यांच्या सूचनेनुसार शुक्रवार सायंकाळी साडेसातच्या सुमारास आचरा मालवण रस्त्यावर हायस्कूल समोर मंडल अधिकारी आचरा अजय परब व त्यांच्या पथकालाअनधिकृत पणे वाळू वाहतूक करणार MH07 C- 6519 ,व MH07X-0124 हे दोन डंपर आढळून आले. यावर कारवाई करत महसूल पथकाने पंचनामा करून आचरा पोलिसांच्या ताब्यात दिले

ओरोस येथील महसूल भरारी पथकाची एका डंपरवर कारवाई

चिंदर सडेवाडी नजिक ओरस येथून आलेल्या महसूल भरारी पथकास गाडी क्रमांक MH07 X-0261 हा डंपर बेकायदेशीर वाळू वाहतूक करताना सापडला असून या पथकाने कारवाई करत सदर डंपर आचरा पोलीस ठाणे आचरा येथे जमा केला आहे. सदर तिन्ही डंपर तहसीलदार मालवण यांच्या कडील दंडनीय आदेश होई पर्यंत तीनही गाड्या आचरा पोलीस ठाणे येथे जमा करण्यात आल्या आहेत. या मोहिमेत आचरा मंडल अधिकारी अजय परब यांच्या सोबत वायंगणी तलाठी व्ही. व्ही. कंठाळे, भटवाडी तलाठी योगेश माळी चिंदर तलाठी संतोष जाधव पोलीस पाटील विठ्ठल धुरी व पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.

Related Stories

कोरोना स्थलांतरीत मुलांना प्रवेश देण्यासाठी जिल्हा परिषद सज्ज

Patil_p

होडावडे येथे काजू फॅक्टरीच्या शेडमधील गोवा बनावटीचा दारुसाठा जप्त

Ganeshprasad Gogate

अविनाश लाड यांच्याकडून राजापूर-लांजासाठी 10 टन धान्य

Patil_p

बीएसएनएल एक्सचेंजच्या मशिनरी रूमला आग

Ganeshprasad Gogate

हेवाळे येथील पाणलोट कमात अपहार!

NIKHIL_N

चिपळूण शहरात दोन दिवसात 1366 कुंटुबांचे सर्वेक्षण

Patil_p
error: Content is protected !!