Tarun Bharat

अशरफ घनी यांचा भाऊ तालिबानमध्ये सामील

ऑनलाईन टीम / काबुल :

तालिबानने सत्ता काबीज केल्यानंतर अफगाणिस्तानातील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. असे असतानाच अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांचे बंधू हशमत घनी तालिबानमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे दहशतवादी गटाला बळ येण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हशमत घनी यांना अफगाणिस्तानचे राजकारण आणि मुत्सद्देगिरी चांगलीच ठाऊक आहे. याचा थेट फायदा तालिबानला होईल. अफगाणिस्तान तालिबानने ताब्यात घेतल्यानंतर हशरफ यांनी तालिबानला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. आता ते या दहशतवादी गटात सामील झाले आहेत.

अफगाणिस्तानचा पुढचा राष्ट्राध्यक्ष कोण असेल, यावर तालिबानी नेत्यांचे एकमत होऊ शकत नाही. मुल्ला बरादर यांना यापूर्वी राष्ट्राध्यक्ष व्हायचे होते, पण दहशतवादी संघटनेत बरादर यांच्याविरोधात आवाज उठविण्यात आला. त्यामुळे बरादर याला राष्ट्राध्यक्ष बनवण्यात आले नव्हते.

Related Stories

मिलिंद नार्वेकर शिंदे गटात सामील होणार; गुलाबराव पाटलांच मोठं वक्तव्य

Archana Banage

अमेरिकेचा चीनला दणका : संसदेत डीलिस्टिंग विधेयक मंजूर

Omkar B

गर्भात दिसले भ्रूणाचे एक्स्प्रेशन्स

Patil_p

राज्यातील नगरपालिका, नगरपरिषद निवडणुका जाहीर, साताऱ्यातील ५ पालिकांसाठी १८ ऑगष्ट मतदान

Rahul Gadkar

‘हेरवाड पॅटर्न’ अध्यादेशात जकातवाडीचे नाव घेण्यासंदर्भात अजित पवारांना भेटणार-शिवेंद्रराजें

Archana Banage

पेरूमध्ये कोरोना संकट वाढतेच

Patil_p