कोल्हापूर : प्रतिनिधी
आशा व गटप्रवर्तक यांच्या मागण्या बाबत संघटना प्रतिनिधींशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊ, असे अश्वासन ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी सिटु संलग्न , कोल्हापूर जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियनच्या शिष्टमंडळास दिले. आशा व गटप्रवर्तक यांना सरकारी कर्मचार्यांचा दर्जा मिळावा व आरोग्य सेवेत भरती करताना प्राधान्य देण्यात यावे या मागणीसाठी राज्यातील सुमारे 70 हजार आशा व गटप्रवर्तक 15 जुन 2021 पासून बेमुदत संपावर आहेत . या पार्श्वभूमीवर आज सिटु अंतर्गत कोल्हापूर जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियनच्या वतीने ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांना संघटनेच्या वतीने कागल येथे त्यांच्या निवासस्थानी शिष्टमंडळ भेटले .
या निवेदनामध्ये आशांना 18000 रु व गटप्रवर्तकांना 22000 किमान वेतन मिळावे , कोवीड महामारीत केलेल्या कामासाठी प्रोत्साहन भत्ता 300 रु प्रमाणे सर्व समान शहरी व ग्रामीण आशा व गटप्रवर्तकांना मिळावा , गटप्रवर्तक कांचे अकरा महिन्याचे करार पत्र बंद करून त्यांना आशां प्रमाणे कायम नियुक्तीचे पत्र देण्यात यावे , गटप्रवर्तक यांना आशां प्रमाणे रेकॉर्ड किपिंगसाठी 3000 रु मोबदला मिळावा , राष्ट्रीय मोहिमांमध्ये गटप्रवर्तकांना वेगळा मोबदला देण्यात गटप्रवर्तकांना प्रतिदिन 25 रु दैनिक भत्ता मिळतो त्यामध्ये वाढ करण्यात यावी , आशा व गट प्रवर्तक यांना प्रसूती व मेडिकल रजा या पगारी मिळाव्यात , आशा व गट प्रवर्तक यांना 500 रु मोबाईल भत्ता मिळावा , गटप्रवर्तकांना आशा सॉप्टवेअर भरण्यासाठिचा भत्ता प्रतिदिवस 50 रुआहे ( पाच यावा ,दिवसांकरीता ) आहे तो प्रतिदिवस 500 रु मिळावा.आदी मागण्यांचा समावेश आहे . यावेळी सिटुचे जिल्हा सचिव शिवाजी मगदुम , तालुका संघाचे मा . सदस्य सुरेश बोभाटे , संघटनेच्या जिल्हा अध्यक्षा नेत्रदिपा पाटील , जिल्हा सचिव उज्वला पाटील , तालुका अध्यक्षा मनिषा पाटील , जिल्हा सह सचिव माया पाटील , सुरय्या तेरदाळे आदी उपस्थित होते.


previous post