Tarun Bharat

अशोकराव माने इन्स्टिट्यूशनचे लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन शिक्षण

टोप/वार्ताहर

कोरोना संसर्ग रोगामुळे देशात संचारबंदी लागू झाली आणि चालू अभ्यासक्रम थांबले. अशा आलेल्या आपत्तीतही अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स कोरोनामुळे निर्माण झालेल्या वातावरणात विद्यार्थ्यांचे हित जोपासत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विविध डिजीटल ॲप्लिकेशनचा वापर करीत महाविद्यालयाचे शिक्षक दररोज ऑनलाईन शिक्षण देऊ लागले आहेत अशी माहिती इनचार्ज डायरेक्टर प्रा. प्रविण घेवारी यांनी दिली.

महाविद्यालय ऑनलाईन प्रणालीचा वापर करून घरबसल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे. याचबरोबर अध्ययनासाठी झूम एप्लीकेशन, गुगल क्लास रुम यासारख्या ऑनलाईन व्हिडिओ एडिटिंग प्रणालीचा वापर करून प्राध्यापकांनी विशेष निहाय व्हिडिओ क्लिप तयार करून विद्यार्थ्यांना पुरवणे, व्हाट्सअप समूहाद्वारे नेमून दिलेले कार्य (असाइनमेंट) पूर्ण करून घेणे, विद्यार्थ्यांचे समस्याचे निरसन करणे, प्रश्नावलीचे बँक तयार करणे असे अनेक ऑनलाईन पर्याय उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या उपक्रमाला विद्यार्थी व पालकाकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

डॉ.हणमंत शेटे यांचा इफेक्ट ऑफ प्रोसेस पॅरामिटर्स ऑन सरफेस रफनेस इन हाय प्रेशर कूलेंट ड्रील्लिंग ऑफ ए आई एस आई 1055 स्टील या विषयावरील पेपर स्कोपस इंडेक्सड जर्नल ऑफ मेकॅनिकल इंजिनिरिंग, मलेशिया येथे प्रसिद्ध झाला. व विदुयत अभियांत्रिकीमधील सहायक प्राध्यापक प्रा.आशिष अण्णा मालगावे यांचा हार्डवेयर इम्पलेमेंटेशन ऑफ़ पी वि माइक्रो ग्रिड अकॉम्पनिएड बाय पावर क्वालिटी कंट्रोलर बेस्ड ऑन सिंक्रोनस जनरेटर हा श़ोध निबंध इंटरनेशनल जर्नल ऑफ रीसेंट टेक्नोलॉजी एंड इंजीनियरिंग येथे प्रसिद्ध झाला.

इंटर शाळा न्यू दिल्ली यांचेवतीने विद्यार्थ्यांसाठी वर्क फ्रॉम होम अंतर्गत इंटरंशिपसाठी रजिस्टर करून घेतले आहे. ए आय सी टी न्यू दिल्ली यांचे वतीने नेतृत्व कौशल्य विकासासाठी चेअरमन सहस्रबुद्धे यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन केले. फर्स्ट नोकरी डॉट कॉम व ट्रेनिंग प्लेसमेंट विभाग यांचे संयुक्त विद्यमानाने दोन परीक्षा विद्यार्थ्यांसाठी आयोजित केल्या गेल्या. या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष विजयसिंह माने, कार्याध्यक्ष विकासराव माने व जिल्हा परिषद सदस्या मनिषा माने यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Stories

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! कर्जमुक्ती योजनेसाठी 700 कोटी मंजूर

datta jadhav

सांगली : वसुलीसाठी तगादा, करगणीतील महिला सावकारवर गुन्हा

Archana Banage

Kolhapur : गोवा बनावटीचे 36 लाखांचे मद्य जप्त; भोगावतीजवळ सापळा रचून कारवाई

Abhijeet Khandekar

बीड शेड परिसरातील चार युवकांना कोरोनाची लागण

Archana Banage

‘ते’ धमकीचे पत्र पवारांचे नव्हे; तर ठाकरेंचेच

datta jadhav

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना मृत्यू संख्येत घट

Archana Banage