Tarun Bharat

अशोक चव्हाणांच्या घरावर दगडफेक

नांदेड /प्रतिनिधी

काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेडमधील घरावर अज्ञातांकडून दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. एका अनोळखी महिलने ही दगडफेक केल्याची माहिती समोर येत आहे. ही प्राथमिक माहिती असून अद्याप या घटनेमागील नेमकं कारेन समजू शकलेलं नाही. बुधवार सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे.

दरम्यान, अशोक चव्हाणांच्या घरावर दगडफेक करणारी महिला नक्की कोण होती याची माहिती समोर आलेली नसली तरी ती एक मनोरुग्ण असल्याची बोललं जात आहे. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्यातून पोलीस अधिक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा एक ताफा घटनास्थळी दाखल झाला. मात्र तोपर्यंत ही महिला दगडफेक करुन पसार झाली होती. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. राज्यामध्ये मंत्री असणाऱ्या चव्हाण यांच्या घडावर दगडफेक झाल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे.

Related Stories

कोरोनामुक्त रुग्णांनी प्लाझ्मा दानसाठी पुढाकार घ्यावा

datta jadhav

कोल्हापूर विभागाचे 2535 कोटी विक्रमी जीएसटी संकलन

Abhijeet Khandekar

Naseeruddin Shah Hospitalized : बॉलिवूड अभिनेते नसिरुद्दीन शाह रुग्णालयात दाखल

Archana Banage

सेलिब्रेटिंनी ‘फादर्स डे’निमित्त सोशल मिडियावर व्यक्त केल्या भावना

Abhijeet Khandekar

मुंबई हायकोर्टाकडून मलिकांना दिलासा नाहीच

Archana Banage

कोरोना पार्श्वभूमीवर पंढरपूरात प्रतिदिन 1500 भाविकांना विठ्ठल दर्शन

Archana Banage