Tarun Bharat

अशोक पडळकर अहिल्या पुरस्काराने सन्मानित

Advertisements

वार्ताहर/ म्हसवड

झरे ता. आटपाडी येथील जवाहरलाल नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय झरे चे सहशिक्षक अशोक सिदू पडळकर यांना संस्थेच्या मानाच्या “अहिल्या पुरस्काराने”सन्मानित करण्यात आले. 

त्यांनी संस्थेत 27 वर्ष प्रामाणिकपणे काम करून संस्थेचा नावलौकिक वाढवण्यासाठी मोठय़ा प्रमाणात त्यांनी कष्ट केले आहे.  आज त्यांच्या प्रामाणिक कष्टाचे फळ म्हणून योग्य माणसाचा योग्य सत्कार तो “आहिल्या पुरस्कार” हुतात्मा संकुलाचे नेते वैभव काका नायकवडी मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष विजयसिंह गायकवाड अहिल्या संस्थेचे चेअरमन चोपडे आरएस यांच्या हस्ते प्रदान  करण्यात आला. 

पडळकर यांनी संस्थेत प्रामाणिकपणे काम केल्याने याआधीच संस्थेने संस्थेचे संचालक पदी नेमणूक केली आहे त्यांच्या कार्यात त्यांच्या सुविद्य पत्नी सौ संगीता पडळकर यांचाही मोलाचा वाटा आहे त्या झरे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच असून त्यांनीही झरे गाव च्या विकासात मोलाचा हातभार लावला आहे त्यांच्या दोन मुली इंजिनियर तर एक मुलगा डॉक्टर व एक मुलगी डॉक्टर आहे.

या कार्यक्रमासाठी हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी मुख्याध्यापक महासंघाचे चे अध्यक्ष विजयसिंह गायकवाड संस्थेचे चेअरमन आर एस चोपडे माजी सभापती नारायणराव चवरे सर्व संचालक झरे गावचे सरपंच अधिक माने उपसरपंच हणमंत मोटे तसेच मोठय़ा संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

सातारा : डोंगरावरची मोगरवाडी शाळा स्वातंत्रदिनी झाली टॅबयुक्त शाळा

Archana Banage

एसटी ला प्रवाशांची संख्या मंदावली

Patil_p

राजमाता जिजाऊंच्या जीवनचरित्राने उलगडले रंग

Patil_p

दोन ठिकाणी घरफोडी सव्वा लाखाचा ऐवज लंपास

Patil_p

अजिंक्यताऱ्याच्या कड्यावरून पाय घसरून वृद्ध दरीत पडला

datta jadhav

विकेंडचा आकडा 500 च्या आत

datta jadhav
error: Content is protected !!