Tarun Bharat

अश्वनी भाटिया लवकरच एसबीआयच्या एमडीपदी

मुंबई

 देशातील सर्वात मोठी म्युच्युअल फंड कंपनी एसबीआय म्युच्युअल फंडचे संचालक अश्वनी भाटिया लवकरच भारतीय स्टेट बँकेच्या(एसबीआय) व्यवस्थापकीय संचालक पदावर रुजू होणार आहेत. एसबीआयमध्ये साधारणतः तीन व्यवस्थापकीय संचालक आहेत. निवडीनंतर भाटिया हे चौथे एमडी असतील. 31 मार्च रोजी निवृत्त झालेले पी.के.गुप्ता यांच्या रिक्त जागी अश्वनी यांची निवड करण्यात येणार आहे. सध्या एसबीआयमध्ये अरिजीत बसू, दिनेश खारा आणि सी.एस. शेट्टी हे एमडी म्हणून कार्यरत आहेत. 

बँकेच्या संचालक मंडळाच्या उपस्थितीमध्ये झालेल्या मुलाखतीच्या दरम्यान अश्वनी भाटिया यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली आहे. आता कॅबिनेटची निवड समिती या संदर्भातला अंतिम निर्णय घेणार असून अश्वनींची निवड जवळजवळ पक्की असल्याचे बोलले जात आहे. एसबीआयने म्युच्युअल फंडने चांगली कामगिरी केली आहे.

Related Stories

कर शुल्क वाढीचा मद्यविक्रीवर परिणाम

Patil_p

नवीन 23 ऊर्जा प्रकल्पांना मंजुरी

Amit Kulkarni

टीसीएसचे 75 टक्के कर्मचारी 2025 पर्यंत वर्क फ्रॉम होम

Patil_p

अमेरिका-चीन तणावाने सेन्सेक्स कोसळला

Patil_p

टीव्हीएस मोटरचा समभाग वधारला

Amit Kulkarni

सेन्सेक्स सावरत 453 अंकांनी मजबूत

Patil_p