वृत्तसंस्था/ प्रिटोरिया
दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू वेन पार्नेलला दुखापत झाल्याने तो बांगलादेशविरूद्ध होणाऱया शेवटच्या वनडे सामन्यात खेळू शकणार नाही. उभय संघातील तीन सामन्यांची ही वनडे मालिका 1-1 अशी बरोबरीत असून बुधवारचा शेवटचा सामना निर्णायक ठरणार आहे.
गेल्या रविवारी झालेल्या या मालिकेतील दुसऱया सामन्यात खेळताना 32 वर्षीय पार्नेलला दुखापत झाली होती. ही दुखापत अद्याप पूर्णपणे बरी झालेली नाही. या मालिकेत बांगलादेशने पहिला सामना जिंकला तर दक्षिण आफ्रिकेने दुसरा सामना जिंकून बरोबरी केली आहे. बांगलादेश संघातील अनुभवी अष्टपैलू शकीब अल हसन शेवटच्या सामन्यात खेळणार असल्याचे सांगण्यात आले. या वनडे मालिकेनंतर उभय संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार असून शकीब अल हसन या मालिकेत उपलब्ध होण्याची शक्यता कमी असल्याचे क्रिकेट बांगलादेशच्या प्रवक्त्याने सांगितले.