Tarun Bharat

असत्यमेव जयते.. जप्तीनंतर संजय राउतांचं ट्विट

मुंबई प्रतिनिधी

शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांची अंमलबजावणी संचलनालयाने (ED) अलिबाग आणि दादरमधील संपत्ती जप्त केली आहे. या कारवाईत ईडीने अलिबागमधील आठ भूखंड आणि दादरमधील फ्लॅट अशा एकूण 1 हजार 34 कोटींच्या मालमत्तेवर टाच आणली असून यामुळे राजकिय क्षेत्रात खळबळ माजली आहे.

पत्राचाळ जमिन घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली असून या कारवाईनंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी ट्विटरवर पहिली प्रतिक्रिया देताना “असत्यमेव जयते” एवढंच ट्वीट केलं आहे.

“ईडी किंवा सीबीआय माझ्या मागे लागली आहे, याची मला कल्पना होती, या कारवाईचं मला आश्चर्य वाटत असेल, अशा कारवाईमुळे संजय राऊत आणि शिवसेना खचली आहे, असं कोणाला वाटत असेल तर त्यात तथ्य नाही. मुंबईतील राहत घर ईडीने जप्त केलं” असंही संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले.

संजय राऊत यांची संपत्ती जप्त केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी लगेच पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला. त्यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल करून ईडीच्या कारवाईची पूर्वकल्पना राऊतांना होती असा दावा केला. तसेच यामुळेच संजय राउत यांनी 55 लाख रुपये परत करुन स्वत:च अप्रत्यक्ष कबुली दिली आहे, असंही किरीट सोमय्या म्हणाले.

Related Stories

चळवळीतील मित्राने दिला अग्नी!

Archana Banage

मिरजेत वृध्दाला 46 हजारांचा ऑनलाईन गंडा

Abhijeet Khandekar

1 मेपासून बेळगावात आयुर्वेद केंद्र

Patil_p

राष्ट्रवादीने केला इंधन दरवाढीचा निषेध

Archana Banage

विलासकाकांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शनासाठी लोटला जनसागर

Patil_p

Maratha Reservation : राज्याचं शिष्ठमंडळ राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या भेटीला

Archana Banage