Tarun Bharat

असदुद्दीन ओवेसींची प्रचारसभेत पोलिसांना धमकी; व्हिडीओ व्हायरल

ऑनलाईन टीम/तरुण भारत

उत्तर प्रदेशातील पोलिसांकडून मुस्लीमांवर अत्याचार होत आहे, असे सांगत एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी या प्रचारसभेत पोलिसांना धमकी दिल्याचे या चित्रफितीमध्ये दिसत असल्याचा आरोप आहे. ‘योगी आदित्यनाथ हे नेहमी मुख्यमंत्री राहाणार नाहीत आणि नरेंद्र मोदी हे नेहमी पंतप्रधान राहाणार नाहीत. पोलिसांकडून मुस्लीमांवर अत्याचार होत असून हा अन्याय आम्ही कधीही विसरणार नाहीत. परिस्थिती बदलणार आहे. योगी पुन्हा मठात जातील आणि मोदी हिमालयात जातील, त्यावेळी तुम्हाला कोण वाचवणार,’ असे ओवेसी म्हणाल्याचा दावा त्यांचे विरोधक करीत आहेत.

दरम्यान व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर निर्माण होणारा वाद पाहून ओवेसी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ओवेसी यांनी आपल्या भाषणातील काही भाग काढून व्हायरल करत चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचा दावा केला आहे. माझ्या ४५ मिनिटांच्या भाषणातील एक मिनिटांचा व्हिडीओ एडिट करुन व्हायरल करण्यात आला असं ते म्हणाले आहेत.

Related Stories

महाराष्ट्रात 10 वीचा निकाल 31 जुलैपर्यंत, तर 12 वीचा 15 ते 20 जुलै दरम्यान

Tousif Mujawar

आफ्रिकन चित्त्यांची ‘कुनो’मध्ये मौज-मस्ती

Patil_p

कॉंग्रस पक्षाने संपुर्ण देशाला वेठीस धरले : देवेंद्र फडणवीस

Abhijeet Khandekar

नरेंद्र मोदी सोनिया मातोश्रींच्या कृपेने सत्तेवर आलेले नाहीत; भातखळकरांचा पटोलेंवर पलटवार

Archana Banage

‘या’ मंत्र्याच्या मुलाने पॅरिसच्या आयफेल टॉवरवर एका मुलीला केला प्रपोज

Archana Banage

एकनाथ शिंदेंच्या बंडावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; मुख्यमंत्री कोणाला करायचं हे सेना ठरवेल

Archana Banage