Tarun Bharat

असदुद्दीन ओवैसींच्या घराची तोडफोड; हिंदू सेनेचे 5 जण ताब्यात

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या दिल्लीतील घराची हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी हिंदू सेना संघटनेच्या 5 जणांना ताब्यात घेतले आहे.

ओवैसी हे माध्यमांमध्ये चर्तेत राहण्यासाठी सातत्याने हिंदूविरोधी विधान करतात. त्यामुळे मंगळवारी हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी ओवैसींच्या दिल्लीतील 24 अशोक रोड येथील घरासमोर निदर्शने करत तोडफोड केली. यावेळी ओवैसी घरी नव्हते. दरम्यान, हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी ओवैसेंच्या घराबाहेरील नेमप्लेट, लॅम्प आणि काचा फोडल्या आहेत. ओवैसींच्या घरावरील हल्ल्याची माहिती मिळताच नवी दिल्लीचे पोलीस प्रमुख घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर, घटनास्थळावरुन 5 जणांना ताब्यात घेण्यात आले असून संसद मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान, हिंदू सेना संघटनेचे अध्यक्ष विष्णू गुप्ता म्हणाले, ओवैसी नेहमीच आपल्या भाषणात हिंदूविरोधी वक्तव्य करतात. त्यामुळे हिंदू सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. चर्चेत राहण्यासाठी हिंदूंना कमी लेखण्याचे काम ओवैसींकडून होत आहे. त्यांनी हिंदूंच्या धार्मिक भावनांशी खेळू नये, असेही ते म्हणाले.

Related Stories

उमेदवारीसाठी 10 वेळा फोन केला, आता प्रशासक घेऊन निवडणूक लढवा-संजय पवार

Abhijeet Khandekar

“शिवसेना, सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर टीका करतो म्हणून माझं निलंबन”

Archana Banage

लोकशाही अन् समाजासाठी काँग्रेसचे पुनरुज्जीवन महत्त्वाचे

Patil_p

भारताचा लडाख सीमेवर युद्धसराव; लढाऊ विमानांचाही सहभाग

datta jadhav

दिल्लीत मागील 24 तासात 381 नवे कोरोना रुग्ण; 1,189 जणांना डिस्चार्ज!

Tousif Mujawar

“हिंदूवर अन्याय करणे हा महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम”

Archana Banage