Tarun Bharat

असा आहे ‘फ्री लूक’ कालावधी

विमा पॉलिसी ही काळाची गरज आहे. बरेचदा घाईगडबडीत किंवा कोणीतरी सांगितलं म्हणून आपण पॉलिसी घेतो. पण मग ती पॉलिसी आपल्यासाठी  योग्य नसल्याचं  किंवा पॉलिसीच्या अटी व शर्थी खूप जाचक असल्याचं लक्षात येतं. पॉलिसी तर घेऊन बसलो आता काय करायचं असं वाटून जातं. पॉलिसी योग्य वाटली नाही तर पंधरा दिवसांच्या आत ती परत करता येते. याला ‘फ्री लूक’ कालावधी म्हणतात. या काळात तुम्ही पॉलिसीचं विश्लेषण करून योग्यतेची खात्री करून घेऊ शकता. पॉलिसी पटली नाही तर ती परत देऊ शकता किंवा नियमांमध्ये बदल करून घेऊ शकता. पॉलिसी परत करण्याच निर्णय घेतल्यास काही शुल्क वजा करून हप्प्याची उर्वरित रक्कम परत दिली जाते.

इंडेम्निटी, क्रिटिकल ईलनेस, वैयक्तिक अपघात विमा या पॉलिसींवरही फ्री लूक कालावधी मिळतो. मात्र यासाठी पॉलिसीचा कालावधी किमान तीन वर्षांचा हवा.

पॉलिसी परत करण्यासाठी कंपनीच्या संकेतस्थळावरून फ्री लूक फॉर्म डाउनलोड करता येईल. या फॉर्ममध्ये माहिती भरावी लागते. तसंच इतर काही कागदपत्रं दाखवावी लागतात. त्यानंतर पॉलिसी परत घेऊन पैसे दिले जातात.

Related Stories

आहारतज्ञांकडे जाताय?

Omkar B

ट्राय दिज हटके लूक्स

Omkar B

टिकवा नात्यातला गोडवा

Amit Kulkarni

हे तय्यार हम

Amit Kulkarni

लिपस्टिक खरेदी करताना

Amit Kulkarni

…म्हणून वाढतं वजन

Omkar B