Tarun Bharat

अहिंसेची जैन धर्माची शिकवण मानवोपयोगी : राजेंद्र केरकर

प्रतिनिधी /पणजी

जैन धर्माची अहिंसा, शाकाहार, भूतदया, प्रेम यांची शिकवण समस्त मानवी समाजाचे कल्याण करणारी असून, महाकवी विद्यासागर महामुनी यांनी आपल्या उक्ती आणि कृतीतून हाच वारसा पुढे नेलेला आहे. असे प्रतिपादन पर्यावरण आणि जैन संस्कृतीचे अभ्यासक राजेंद्र केरकर यांनी काढले.

भारतीय टपाल खात्याच्या गोवा विभाग आणि प्रमाण सागर महाराज आंतरराष्ट्रीय फाऊंडेशनच्या धर्मदाय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दिगंबराचार्य विद्यासागर महामुनी यांच्या संक्रांती शासनाचार्य सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विशेष टपाल आच्छादनाच्या प्रकाशन सोहळ्यात त्यांनी गोव्यातील धर्म आणि संस्कृतीच्या इतिहाचा संक्षिप्त आढावा घेतला.

भारतीय टपाल सेवा अधिकारी डॉ. सुधीर जोखेरे यांनी खात्याच्या वतीने ज्wन धर्म आण संस्कृतीच्या विचारधारेचे महत्त्व अधोरेखित करण्यात येणाऱया प्रयत्ना संदर्भात यावेळी विवेचन केले. जय श्रीराम गोसंवर्धन केंद्र वाळपईचे अध्यक्ष हनुमंत परब यांनी विद्यासागर महाराज आणि जैन धर्मियांमार्फत गोमातेच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी केल्या जाणाऱया अथक प्रयत्नाबाबत कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी प्रतिष्ठानचे सचिव चंद्रकांत भोजे पाटील आणि संचालक सचिन बेडकीहाळे यांनीही आपली मनोगते प्रकट केली. सदर कार्यक्रम पणजी पाटो येथील टपाल भवनाच्या सभाग्रहात संपन्ना झाला.

Related Stories

सारमानस येथे हनुमान मंदिराच्या सभागृहाची पायाभरणी

Amit Kulkarni

कळंगूट डान्स बारमध्ये पोलिसांच्या ‘सेटिंग’द्वारे पर्यटकांची लूट

Amit Kulkarni

तुयेत आज आमदार उल्हास तुयेकर यांचा भव्य सत्कार

Patil_p

जाहिरात दिलेल्या सर्व जागा भरणार

Amit Kulkarni

सोमवारपासून कडक पाऊले उचला

Amit Kulkarni

पाणबुडय़ांचा बचाव करणारी एससीआय साबरमती मुरगाव बंदरात

Amit Kulkarni