Tarun Bharat

अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे दोन एप्रिलला उद्घाटन

महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांची माहिती : खा. शरद पवार उपस्थित राहणार : अडीच कोटींचा निधी खर्च

सांगली/प्रतिनिधी

विजयनगर येथील राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे शनिवार २ एप्रिल रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा खा शरदचंद्र पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. राज्याचे जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील अन्य मंत्री, पदाधिकारी, आमदार, खासदार, नगरसेवक उपस्थित राहणार असल्याची माहिती महापौर दिग्वीजय सुर्यवंशी यांनी पत्रकार बैठकित बोलताना दिली. याशिवाय प्रभाग १७ मधील नाना नानी पार्कचे उद्घाटनही खा. पवार यांच्या हस्ते होणार असल्याचे सुर्यवंशी यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, मनपातील राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, नगरसेवक विष्णू माने, मनगू आबा सरगर, हरिदास पाटील आदी यावेळी उपस्थित होते सुर्यवंशी म्हणाले, अडीच कोटी रुपयांचा निधी खर्च करून महापालिकेच्या वतीने संजयनगर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभा करण्यात आले आहे. यामध्ये होळकर यांची प्रतिकृती, सुसज्ज अभ्यासिकेचा समावेश आहे. सन २०१० मध्ये महाविकास आघाडीची सत्ता असताना स्मारकाच्या कामास सुरवात झाली होती. स्मारकाचे काम पूर्ण झाले असून शनिवार २ एप्रिल रोजी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर स्मारकाचे उदघाटन करण्यात येणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खा शरदचंद्र पवार यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न होईल. राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज म्हणाले, विजयनगर येथील अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक महाराष्ट्रात एकमेव आहे. खा. पवार यांच्या हस्तेच या स्मारकाचे उदघाटन व्हावे असा पालकमंत्री जयंत पाटील यांचा हट्ट होता. या निर्मीत्ताने धनगर समाज मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय महापोर दिग्वीजय सूर्यवंशी यांच्या प्रभागातील नाना नानी पार्कचे उदघाटनही खा. पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

जयंत पाटलांच्या पाठबळामुळेच स्मारक पूर्ण

महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता असताना स्मारकाच्या कामास सुरवात झाली. पालकमंत्री जयंत पाटील यांचे वेळोवेळी पाठबळ लाभले त्यामुळेच हे स्मारक पूर्ण होऊ शकते. कोविड संकटामुळे दोन वर्षापासून स्मारकाचे उद्घाटन प्रलंबीत होते ते २ एप्रिल रोजी होईल याच दिवशी धनगर समाज बांधवांच्या मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले आहे. समस्त धनगर समाज बांधवांनी या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. – विष्णू माने, नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस

Related Stories

मिरज, कवठेमहांकाळ, पलूसमध्ये ऑक्सिजन प्लॅन्ट

Archana Banage

प्रवासी घटल्याने महालक्ष्मी एक्सप्रेस रद्द

Archana Banage

अनधिकृत शाळांवर दंडात्मक कारवाई होणार : अजिंक्य कुंभार

Archana Banage

तानंग व बामनोलीत मटका अड्ड्यावर छापा: दोघा एजंटांना अटक 

Archana Banage

साळमाळगेवाडीत दूध व्यावसायिक तरुणाचा गळा चिरून खून

Archana Banage

केंद्राकडून पुन्हा ‘आरसीईपी’ कराराचा घाट : राजू शेट्टी 

Archana Banage