Tarun Bharat

अहो आश्चर्यम्! ‘तो’ एकाच चेंडूवर दोनवेळा बाद झाला!

जागतिक क्रिकेटमधील नियमांनुसार कोणताही फलंदाज बाद करण्याच्या 11 पद्धती आहेत. यात झेलबाद, त्रिफळाचीत, पायचीत, यष्टीचीत, स्वयंचित, धावचीत, टाईम आऊट, चेंडू हाताळणे, क्षेत्ररक्षणात व्यत्यय आणणे आणि चेंडू एकाच वेळी दोनवेळा फटकावणे यांचा प्राधान्याने समावेश आहे. याशिवाय, निवृत्त होऊन बाद (रिटायर्ड हर्ट नव्हे) ही फलंदाजाने बाद होण्याची अकरावी पद्धत आहे. रविचंद्रन अश्विनमुळे अलीकडेच मंकडिग पद्धतीने फलंदाजाला बाद करण्याची मुभा देखील चर्चेत राहिली आहे. यापैकी कोणत्याही एका पद्धतीने फलंदाजाला बाद करता येते. पण, यंदाच्या आयपीएलमध्ये मंगळवारी अनोखे नाटय़ घडले आणि त्यात सनरायजर्स हैदराबादचा फलंदाज रशीद खान एका चेंडूवर एकदा नव्हे तर चक्क दोनवेळा बाद झाला!

आता एखादा फलंदाज एकाच चेंडूत दोनवेळा कसा काय बाद होऊ शकेल, असा प्रश्न साहजिकच पडेल. पण, येथे रशीद चेंडू फटकावताना यष्टीला पाय लागून बेल्स उदध्वस्त झाल्याने हिट विकेट झाला आणि लाँगऑनवरील दीपक चहरने झेल घेतल्यानंतर झेलबादही झाला. सीएसकेविरुद्ध 147 धावांचा पाठलाग करताना रशीदने उत्तूंग षटके मारण्याचे पुरेपूर प्रयत्न केले. फिरकीपटू कर्ण शर्माने स्थिरस्थावर झालेल्या केन विल्यम्सनला डावातील 18 व्या षटकात बाद केल्यानंतर सर्वांच्या नजरा रशीदवरच होत्या. रशीदने त्या षटकात कर्णला षटकार खेचला असल्याने साहजिकच त्याचा उत्साह दुणावला होता. पण, 19 व्या षटकात मध्यमगती गोलंदाज शार्दुल ठाकुरच्या लो फुलटॉसवर रशीदचा दोन प्रकारे अंदाज चुकला.

या लो फुलटॉसवर रशीदने हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण, येथे प्रारंभी तो पाय ऑफस्टम्पला लागल्यानंतर स्वयंचीत बाद झाला तर पुढे चेंडू फटकावल्यानंतर लाँगऑनवरील दीपक चहरने त्याचा झेलही टिपला. अशा रितीने रशीद एका चेंडूवर दोनवेळा बाद होणारा या हंगामातील पहिला फलंदाज ठरला. तो सर्वप्रथम हिटविकेट झाला असल्याने रेकॉर्ड बुकात त्या प्रकारे नोंद झाली.  

Related Stories

सूर्यकुमार यादव इंग्लंडला रवाना

Patil_p

महाराष्ट्रला सातव्यांदा दुहेरी मुकुट, कर्नाटकला उपविजेतेपद

Amit Kulkarni

पाकिस्तानची सेमीफायनलच्या दिशेने आगेकूच

Patil_p

आयर्लंड-नामिबिया आज महत्त्वाची लढत

Amit Kulkarni

मुंबई इंडियन्स संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी बाऊचर

Patil_p

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची कोरोनावर मात!

Tousif Mujawar