Tarun Bharat

अहो आश्चर्यम्! नेटिझन्स चुकले! ‘ती’ महिला नव्हेच!

Advertisements

सनरायजर्स हैदराबाद व कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात अबु धाबीत 35 वी साखळी लढत संपन्न झाली, त्यावेळी प्रत्यक्ष लढतीपेक्षा मैदानावरील एका पंचांसाठी अधिक चर्चा रंगली आणि त्यासाठी कारण ठरले त्यांची महिलासदृश्य हेअरस्टाईल!

आयपीएलमध्ये रविवारची लढत सुरु झाली, त्यापूर्वी दोन्ही पंच मैदानात उतरले, त्यावेळी सर्वांच्याच नजरा उंचावल्या. तसे पाहता, यंदाच्या आयपीएल स्पर्धेसाठी कोणा महिला पंचाची नियुक्ती झाली आहे, असे वृत्त वा चर्चा अजिबात नव्हते. त्यामुळे, अचानक ही कोण महिला पंच मैदानात उतरली, असा प्रश्न चाहत्यांना पडल्याशिवाय राहवला नाही. पण, प्रत्यक्षात सदर व्यक्ती महिला नव्हे तर पुरुषच असल्याचे काही क्षणात स्पष्ट झाले आणि हा गोंधळ ज्यांच्यामुळे निर्माण झाला, त्या पंचांचे नाव म्हणजे पश्चिम पाठक!

पश्चिम पाठक यांनी 2014 मध्ये आयपीएल स्पर्धेत पंच या नात्याने पदार्पण केले. आजवर त्यांनी 8 आयपीएल सामन्यांमध्ये पंच म्हणून काम पाहिले आणि या प्रत्येक वेळी या ना त्या कारणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पाठक यांनी 2012 मध्ये महिला संघातील दोन लढतीतही पंच म्हणून काम पाहिले. शिवाय, 2015 मध्ये हेल्मेट घालून मैदानावर आपली जबाबदारी पार पाडणारे ते पहिले पंच ठरले.

रविवारी, लांब वाढलेल्या केसात ते मैदानावर आले, त्यावेळी क्षणभर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पण, त्यानंतर काही वेळात वस्तुस्थिती स्पष्ट झाली. तोवर तिकडे नेटिझन्समध्ये मात्र या पंचांवरुन बराच ‘दंगा’ सुरु झाला होता.

एका युजरने लिहिले, ‘हेअर गोल्स ब्रो….लडकियाँ भी शर्मा जाएगी’! एक युजर म्हणाला, ‘बाल भी मस्त, नाम भी मस्त’! एका युजरने पश्चिम पाठक ‘अँटिक अम्पायर’ असल्याचे नमूद केले तर एका युजरने ‘डिफरन्ट पोझ’ इतकी टिपणी केली. आणखी एका युजरला पश्चिम पाठकना पाहून बॉबी देओलची आठवण आली आणि तो युजर म्हणाला, दुनिया हसीनो का मेला!

Related Stories

झुंजार फलंदाजीनंतरही भारत पराभूत

Patil_p

स्वप्नील-ऍशी यांच्याकडून नेमबाजीत सुवर्णपदक

Patil_p

फुटबॉल शौकिनांच्या संख्येवर निर्बंध

Patil_p

स्वीडन महिला फुटबॉल संघ उपांत्य फेरीत

Patil_p

न्यूझीलंड दौऱयासाठी संघनिवड आज

Patil_p

पी.टी. उषाची केरळ मुख्यमंत्र्यांना विनंती

Patil_p
error: Content is protected !!