Tarun Bharat

अहो आश्चर्यम! द्रविडचा रुद्रावतार…तो ही थेट रस्त्यावर!

Advertisements

द्रविडच्या जाहिरातीतील संतापी चेहरा ठरतोय ‘टॉक ऑफ द टाऊन’, सोशल मीडियावर मिश्किल प्रतिक्रियांची रेलचेल

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

‘द वॉल’ या टोपण नावाने ओळखल्या जाणाऱया राहुल द्रविडने सार्वजनिक आयुष्यात आजवर एकदाही आपली मर्यादा ओलांडलेली नाही. अर्थात, इंटरनेटवर व्हायरल झालेल्या एका जाहिरातीतील त्याचा रुद्रावतार चक्क ‘टॉक ऑफ द टाऊन’ ठरला असून यावर सोशल मीडियावर एकापेक्षा एक, अव्वल मिश्किल प्रतिक्रिया उमटत आहेत.

अवघ्या 11 सेकंदाच्या या जाहिरातीत द्रविडचा ‘गुस्सेवाला’ अवतार दाखवला गेला असून यात द्रविड अक्राळविक्राळ ओरडत असताना, बॅटने समोरील कारच्या दरवाजावर, मिररवर जोरदार प्रहार करताना आणि आपल्या कारच्या स्टीयरिंगवर हात आदळत प्रचंड संताप व्यक्त केले जात असताना दाखवले गेले आहे. इंदिरा नगर का गुंडा या हॅशटॅगखाली एखाद्या वणव्याप्रमाणे ही जाहिरात व्हायरल झाली असून 48 वर्षीय द्रविड ट्वीटरवर चांगलाच ट्रेंड होत राहिला आहे.

ही जाहिरात बेंगळुरातील वर्दळीच्या रस्त्यावर चित्रित केली गेली असून यात द्रविड आपल्या कार विंडोमधून बाहेर वाकत प्रचंड संतापून ओरडत असल्याचे दाखवले गेले आहे. शांत, संयमी प्रवृत्तीच्या द्रविडच्या तोंडून जाहिरातदारांनी ‘इंदिरा नगर का गुंडा हू मै’, अशी वाक्येही घातली आहेत.

एरवी राहुल द्रविड फारशा जाहिराती करत नाही, हे सर्वश्रुत आहे. या अनोख्या, अनपेक्षित जाहिरातीने मात्र खळबळ उडवली आहे. सोशल मीडियावरील युजर्सच्या यावर मजेदार प्रतिक्रिया देखील लक्षवेधी आहेत. एक युजर यात गंमतीने म्हणतो, हात जोडकर गुजारिश है आपसे, दूर रहिये मेरे बेटेसे!

आणखी एक युजर म्हणाला, 10 सेकंदात द्रविडसारखी अशी जाहिरात क्रीडा क्षेत्रातील आणखी कोणताही सेलेब्रिटी करु शकणार नाही. शताक्षी शर्मा ही युवती एका ट्वीटमध्ये म्हणाली, आम्हाला अशाच प्रकारचे गुंडे हवे आहेत आणि सर्वात शेवटी एक मजेदार टिपणी अशी होती, ज्यात म्हटले होते, न जाणो या जाहिरातीसाठी द्रविडने ती कार, कारची मिरर, कारचा मालक या सर्वांची किती हजार वेळा माफी मागितली असेल!

Related Stories

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी : भारताचा बांगलादेशवर एकतर्फी विजय

Amit Kulkarni

म्हापशातील ओल्या कचऱयावर प्रतिदिन 10 टन प्रक्रिया करण्याचा विचार- मंत्री मायकल लोबो

Patil_p

मोहम्मद शमीची मजुरांना मदत

Patil_p

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार रकमेत भरीव वाढ?

Patil_p

ऑस्ट्रेलिया दौऱयासाठी संघनिवड पुढील आठवडय़ात?

Patil_p

भारताचे सात मुष्टियोद्धे अंतिम फेरीत

Amit Kulkarni
error: Content is protected !!