Tarun Bharat

अ‍ॅलोपॅथी व डॉक्टरांवर वादग्रस्त वक्तव्य करणे पडले महागात ; बाबा रामदेव यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल

Advertisements


नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम

कोरोना काळात योगगुरू बाबा रामदेव यांनी अ‍ॅलोपॅथी व डॉक्टरांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्याविरोधात आता इंडियन मेडिकल असोसिएशनने गुन्हा दाखल केला आहे.योगगुरू बाबा रामदेव यांच्यावर साथरोग कायदा, १८९७ आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा,२००५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागच्या काही दिवसांपासून योगगुरू बाबा रामदेव त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत.

अ‍ॅलोपॅथी डॉक्टर व अ‍ॅलोपॅथी उपचारपद्धती यावरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे योगगुरू बाबा रामदेव वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. बाबा रामदेव यांनी केलेल्या वक्तव्यावर इंडियन मेडिकल असोसिएशनकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. बाबा रामदेव यांना अटक करण्याचा हॅशटॅगही सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये होता. त्यावर बोलताना बाबा रामदेव यांनी “कुणाचा बापही आपल्याला अटक करू शकत नाही, अस वक्तव्य केल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रंचड व्हायरल झाला. या व्हिडिओवरून देखील बाबा रामदेव यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. अनेकांनी त्यांचा हा व्हायरल व्हिडिओ ट्वीटकरुन त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

बाबा रामदेव यांनी केलेल्या विधानांचा निषेध करत आयएमएने बाबा रामदेव यांच्याविरुद्ध साथरोग कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. तसेच बाबा रामदेव यांनी १५ दिवसात माफी मागावी अन्यथा १००० कोटी रुपयांची भरपाई द्यावी, अशी नोटीस देखील आयएमएने बजावली होती. त्यानंतर आता त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Related Stories

उत्तरप्रदेशातील भीषण दुर्घटनेत 14 जण ठार, 30 जखमी

Amit Kulkarni

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरुच : मागील 24 तासात 41,383 नवे रुग्ण; 507 मृत्यू

Rohan_P

‘वेला’ स्कॉर्पियन पाणबुडी नौदलात सामील

Patil_p

जगभरातील कोरोनाबळींची संख्या 7.77 लाखांवर

datta jadhav

दिलासादायक : उत्तराखंडात सात जिल्ह्यात आढळला नाही एकही रुग्ण

Rohan_P

…तर पाकिस्तानचा काळ्या यादीत समावेश होईल

datta jadhav
error: Content is protected !!