सांस्कृतिक प्रतिनिधी /फोंडा
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 101 व्या जयंती निमित्त बुधवार 25 रोजी ऑनलाईन माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय मराठी कवी संमेलनात गोमंतकीय कवी रमेश वंसकर हे सहभागी होणार आहेत. सायं. 5 वा. झुमऍपवर हे संमेलन प्रसारीत होणार आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी, चिंचवड, मातंग साहित्य परिषद, पुणे व एल्गार सामाजिक साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हे कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्र, कर्नाटक व मध्यप्रदेशमधून एकूण 16 कवींना त्यात आमंत्रित करण्यात आले आहे. रमेश वंसकर हे गोवा राज्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.