Tarun Bharat

आंचिमचा आज समारोप

अभिनेत्री झिनत अमानची उपस्थिती, उत्कृष्ट चित्रपटासाठी चाळीस लाख व सुवर्ण मयूर

प्रतिनिधी/ पणजी

मागील आठ दिवस पणजीत सुरू असलेल्या 51व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप सोहळा आज रविवार दि. 24 जानेवारी रोजी दुपारी 3.30 वा. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम बांबोळी येथे होणार असून यावेळी नामवंत अभिनेत्री झिनत अमान, केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोवा मनोरंजन सोसायटीचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई उपस्थित राहणार आहेत.

यंदाच्या महोत्सवात इंडियन पॅनोरमा, आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभाग, होमेज, रेट्रोस्पेक्टिव्ह, सत्यजित रे श्रद्धांजली विभाग, मिडफेस्ट, गोमंतकीय विभाग, स्पेशल स्क्रीनिंग, उद्घाटन व समारोपाचा चित्रपट, कंट्री फोकस, असे 16 विभागांतून 190 चित्रपट प्रदर्शित करण्यात आले. 

 यंदा महोत्सवातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जगभरातील 15 सिनेमांची निवड करण्यात आली असून यातील एका चित्रपटाला मानाचा ’सुवर्ण मयूर’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. भारताचे प्रतिनिधीत्व करणारे ब्रिज, अ डॉग अँड हिज मॅन, आणि थेन हे चित्रपट पोर्तुगालतून द डोमेन, डेन्मार्कतून इन टू द डार्कनेस, बल्गेरिया फ्रान्समधून फेब्रुवारी, फ्रान्सचा माय बेस्ट पार्ट, पोलंड आयर्लंडचा आय नेव्हर क्राय, चिलीचा ला वेरॉनिका, साऊथ कोरियाचा लाईट फॉर द युथ, स्पेनचा रेड मून टाइड, इराणचा ड्राम अबाऊट सोहरब, अफगाणिस्तानचा द डॉग्स डिडन्ट स्लीप लास्ट नाईट, तैवानचा द सायलेंट फॉरेस्ट, स्वित्झर्लंडचा द फॉरगॉटन हे चित्रपट सुवर्ण मयूर पटकाविण्याच्या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

उत्कृष्ट चित्रपटासाठी 40 लाख व सुवर्ण मयूर, तसेच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठी 15 लाख रोख व रौप्य मयूर देण्यात येणार आहे. उत्कृष्ट अभिनेता व अभिनेत्री पुरस्कारासाठी 10 हजार रोख व रौप्य मयूर आणि प्रमाणपत्र, ज्युरी पुरस्कार चित्रपटासाठी 15 लाख रुपये, रौप्य मयूर व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

Related Stories

चांदर येथे तरूणीला भर दिवसा दोन युवकांनी ‘डेटॉल’ पाजले

Patil_p

सप्टेंबर महिन्यात सासष्टीत कोरोनाचे 21 बळी

Patil_p

दोन वर्षानंतर सत्तरीतील शाळा पुन्हा गजबजल्या

Amit Kulkarni

कोविडचे ढासळलेले व्यवस्थापन सावरण्यासाठी सर्वांना विश्वासात घ्या

Omkar B

पालये भूमिका टेक्निकल इन्स्टिटय़ूटमध्ये नाताळ

Patil_p

दिशा रवीला अटक प्रकरणी महिला काँग्रेसकडून निषेध

Amit Kulkarni