Tarun Bharat

आंजर्ले समुद्रात बुडून तिघांचा मृत्यू

पुण्यातील एकाच कंपनीतील कर्मचारी

प्रतिनिधी/ दापोली

तालुक्यातील आंजर्ले समुद्रकिनारी पुणे येथून पर्यटनासाठी आलेल्या 14 पर्यटकांपैकी तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. बुडणाऱया अन्य तिघांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले. हे सर्व जण एकाच कंपनीत नोकरीस होते.

शुक्रवारी दुपारी घडलेल्या या दुर्दैवी घटनेत अक्षय राखेलकर (31), विकास श्रीवास्तव (25) व मनोज गावंडे (24) यांचा मृत्यू झाला असून, जुबेद खान, निहाल चव्हाण व रोहित पालांडे या बुडणाऱया तिघांना वाचवण्यात यश आले. पुणे-पिंपरी येथील कॉन्स्ट्रीटीक टेक्नॉलॉजी या कंपनीतील मनोज गावंडे, विकास श्रीवास्तव, अक्षय राखेलकर, रोहित पालांडे, जुबेर खान, निहाल चव्हाण, दीपेश कड, लोकेश पाटील, रुईन शेख, प्रतिभा भालेराव, प्रिया जोशी, शिवानी गुरव, अवंतिका सोनावणे व अथर्व कळमशेरे आदी 14 जण शुक्रवारी दापोलीत दाखल झाले. हे सर्वजण सर्वप्रथम मुरुड येथे गेले. तेथे नाश्ता केल्यानंतर ते मुर्डी येथे वरद छाया या रिसॉर्टमध्ये उतरले. रिसॉर्टमध्ये आल्यानंतर प्रेश होऊन सर्व  समुद्रकिनारी पोहण्यासाठी गेले. आपली सहकारी प्रतिभा भालेराव यांना समुद्रकिनारी बसवून अन्य जण समुद्रामध्ये पोहण्यासाठी गेले.

  ओहोटीच्या पाण्यात ओढले गेले

यावेळी समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने ते ओहोटीच्या पाण्यात ओढले गेले. निहाल चव्हाण व अक्षय राखेलकर समुद्राच्या खोल पाण्यात बुडू लागले. त्यांना वाचवण्यासाठी मनोज गावंडे व जुबेद खान यांनी त्यांच्या दिशेने धाव घेतली. यावेळी उर्वरित सर्वांनी आरडाओरडा केल्याने किनाऱयालगतच्या अभिनय केळसकर, नीतेश देवकर, नीलेश गुहागरकर, तृशांत भाटकर, अभिजित भाटकर, बाळा केळसकर, आवा मयेकर, दीपा आरेकर, पप्पू केळसकर आदी ग्रामस्थांनीही समुद्राच्या दिशेने धाव घेतली. प्रयत्न करूनही त्यांना अक्षय राखेलकर, विकास श्रीवास्तव व मनोज गावंडे यांना वाचवता आले नाही. मात्र जुबेर खान, निहाल चव्हाण व रोहित पालांडे यांना वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले.

मृतांमधील मनोज गावंडे व विकास श्रीवास्तव हे अविवाहित होते, तर अक्षय राखेलकर विवाहित असून त्यांच्या पश्चात पत्नी व एक लहान मुलगी असा परिवार आहे. या घटनेचा अधिक तपास दापोली पोलीस करत आहेत.

Related Stories

रघुवीर घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प

Patil_p

‘श्व्रास’ चित्रपटामुळेच जीवनाला दिशा मिळाली

Patil_p

सावंतवाडीत चोरीचे सत्र सुरूच

Anuja Kudatarkar

भंडारी समाजातील कुटुंबाच्या जनगणनेचा 1 जानेवारीला देवगडात होणार शुभारंभ

Anuja Kudatarkar

चिपळूणचा पूर लाल रेषेवर नाही

Patil_p

रेल्वेतून पडून प्रवाशाचा मृत्यू

Anuja Kudatarkar