Tarun Bharat

आंतरजिल्हा प्रवासासाठी पासची आवश्यकता नाही

Advertisements

राज्य पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांचे स्पष्टीकरण

प्रतिनिधी/ बेंगळूर

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेला लॉकडाऊन आणखी शिथिल झाल्यानंतर पोलीस खात्याने आंतरजिल्हा प्रवास करणाऱयांना दिलासा दिला आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही जिल्हय़ात जाण्यासाठी पासची आवश्यकता नाही, असे स्पष्टीकरण राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांनी दिले आहे.

तिसऱया लॉकडाऊनपर्यंत राज्यातील एका जिल्हय़ातून दुसऱया जिल्हय़ात जाण्यासाठी सेवा सिंधू ऍपद्वारे दिल्या जाणाऱया ई-पासची आवश्यकता भासत होती. मात्र चौथ्या लॉकडाऊनमध्ये नियम शिथिल करण्यात आल्यामुळे ज्याप्रमाणे बसमधून आंतरजिल्हा प्रवास करताना बसची गरज नाही. त्याप्रमाणे खासगी वाहनाने परजिल्हय़ात जाण्यासाठीही कोणत्याही पासची आवश्यकता नाही.  खासगी वाहनांना यापूर्वी पासबाबत लागू असलेला नियम आता रद्द करण्यात आला आहे. मात्र या सर्वांना लॉकडाऊन नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. सायंकाळी 7 ते दुसऱया दिवशी सकाळी 7 पर्यंत कोणत्याही खासगी वाहनांचा संचार निषिद्ध आहे, अशी माहिती सूद यांनी ट्विटरवर दिली आहे.

राज्य सरकारने मंगळवार दि. 19 मे पासून जारी केलेल्या चौथ्या लॉकडाऊन मार्गसूचीप्रमाणे 31 मे पर्यंत प्रत्येक रविवारी संपूर्ण लॉकडाऊन राहणार आहे. त्यामुळे या दिवशी वाहन संचारावरही निर्बंध राहणार आहे.

Related Stories

बिपिन रावत यांना ‘पद्मविभूषण’

Patil_p

राजस्थानात काँगेस सरकार संकटात?

Patil_p

रशियन सैनिकांचा ‘काळ’ ठरली युक्रेनची लेडी डेथ

Patil_p

माजी मंत्री राजीव बॅनर्जी यांची घरवापसी

datta jadhav

”शिखांच्या पगडीला विरोध नाही मग हिजाबला का ?”

Abhijeet Khandekar

जीप नदीत कोसळून 9 वऱहाडींना जलसमाधी

Patil_p
error: Content is protected !!