Tarun Bharat

आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसचे पुनरागमन

वृत्तसंस्था/ शांघाय

कोरोना महामारी समस्येमुळे जवळपास आठ महिन्यांच्या कालावधीत आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रातील घडामोडी पूर्णपणे ठप्प झाल्या होत्या याला टेबल टेनिस हा क्रीडाप्रकारही अपवाद नव्हता. दरम्यान आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस पुन्हा तब्बल 238 दिवसांच्या कालावधीनंतर पुन्हा सुरू होत आहे. चीनमध्ये चालू आठवडय़ात आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेला प्रारंभ होत आहे.

येथे रविवारपासून महिलांच्या विश्वचषक टेबल टेनिस स्पर्धेला वेहेई येथे प्रारंभ झाला असून सदर स्पर्धा बंदीस्त स्टेडियममध्ये खेळविली जात आहे. या स्पर्धेत विविध देशांच्या 21 टेबल टेनिसपटूंनी आपला सहभाग दर्शविला आहे. आता या स्पर्धेनंतर चीनमध्ये आणखी दोन आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धा घेतल्या जाणार असल्याची माहिती फेडरेशनच्या प्रवक्त्याने दिली. या स्पर्धेत सुरूवातीला खेळाडूंमध्ये कोरोनाची भीती जाणवत होती पण प्रत्येक खेळाडूंने आपले मानसिक र्नैराश्य झटकून पुन्हा नव्या उमेदीने खेळण्याचा निर्धार केला आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात युक्रेनच्या पिसोस्काने अमेरिकेच्या 24 वर्षीय लिली झेंगचा पराभव केला.

टेबल टेनिस क्षेत्रामध्ये चीनने आपली मक्तेदारी राखली आहे. दरम्यान चालू आठवडाअखेरीस पुरूषांच्या विश्वचषक टेबल टेनिस स्पर्धेचे यजमानपद चीन भूषविणार आहे. त्यानंतर 19 ते 22 नोव्हेंबर दरम्यान आयटीटीएफ अंतिम स्पर्धा झेंगझोयु येथे घेतली जाणार आहे.

Related Stories

भारतीय संघाला पदकाची हुलकावणी, फ्रान्सला कांस्य

Patil_p

बंगाल, तामिळनाडूची विजयी सलामी

Patil_p

बार्सिलोनाचा निसटता विजय, मेसीचा 500 वा सामना

Patil_p

कसोटी मानांकनातील कोहलीचे अग्रस्थान कायम

Patil_p

मुशफिकुर रहीमचे 60 चेंडूत शतक

Patil_p

भारतीय तिरंदाजी संघटनेला अखेर मान्यता

Patil_p