Tarun Bharat

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानला 1.4 बिलियन डॉलरचे अतिरिक्त कर्ज

ऑनलाईन टीम / इस्लामाबाद : 

कर्जबाजारी पाकिस्तानची आर्थिक स्थिती कोरोनामुळे आणखी कोलमडली असतानाच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला 1.4 बिलियन डॉलरचे अतिरिक्त कर्ज मंजूर केले आहे. त्यामुळे पाकिस्तानला काहीसा दिलासा मिळाला आहे.
     

आर्थिक अडचणींमुळे पाकिस्तान कोरोनासारख्या भीषण परिस्थितीचा सामना करू शकत नाही.  कोरोनाच्या संकटाशी दोन हात करताना पाकिस्तानला नाकीनऊ आल्याने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जगापुढे हात पसरून आर्थिक मदतीचे आवाहन केले होते. लॉकडाऊनमुळे देशभरात सर्व व्यवसाय बंद पडल्यामुळे आता पाकिस्तानात उपासमारीची समस्या निर्माण झाली आहे. ‘पाकिस्तानला आर्थिक मदत करा, अन्यथा कोरोना होण्यापूर्वीच लोक उपासमारीने मरतील, असेही त्यांनी म्हटले होते. तसेच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांनी पाकिस्तानसारख्या कर्जबाजारी  देशावरील कर्ज माफ करावे, असे आवाहनही इम्रान खान यांनी केले होते.
 त्यानंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला 1.4 बिलियन डॉलरचे अतिरिक्त कर्ज मंजूर केले आहे. पाकिस्तानला या निधीचा उपयोग तिजोरी भरण्यासाठी होणार आहे.

Related Stories

अर्ज भरलेल्या सप उमेदवाराचा भाजपमध्ये प्रवेश

Patil_p

विक्रेते, फेरीवाल्यांची चाचणी होणार

Patil_p

झिम्बाब्वेकडून लिथियमची निर्यात बंद

Patil_p

सोलापूर ग्रामीणमध्ये रविवारी 20 कोरोनाबाधितांची भर

Archana Banage

आजचे भविष्य मंगळवार दि. 21 एप्रिल 2020

Patil_p

Amitabh in high Courtअमिताभ बच्चन यांची हायकोर्टाच धाव; आपल्या प्रतिमेला मागितले संरक्षण

Abhijeet Khandekar