Tarun Bharat

आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताच्या न्यायाधीशांनी मांडली रशिया विरोधात भूमिका

ऑनलाईन टीम/तरुण भारत

रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या काही दिवसांपासून युद्ध सुरू आहे. रशियाकडून सातत्याने युक्रेनवर आक्रमण केले जात आहे. रशिया ज्या प्रकारे युक्रेनविरोधात बळाचा वापर करत आहे. यावर जगभरातून रशियावर टीका होत असून विविध माध्यमातून रशियावर दबाव आणला जात आहे. तरीही रशियाचे युक्रेनवरील हल्ले थांबलेले नाहीत त्याबद्दल इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसने चिंता व्यक्त केली आहे. कोर्टाने बुधवारी रशियाला युक्रेनवरील हल्ले थांबवण्याचे आदेश दिले आहोते.

दरम्यान, रशियाने २४ फेब्रुवारी रोजी युक्रेनविरोधात युद्ध पुकारत हल्ले सुरु केले आहेत. ते आजही सुरु असून युक्रेनचे मोठ्याप्रमाणात निक्सन झाले आहे. . दरम्यान, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसने रशिया ज्या प्रकारे युक्रेनविरोधात बळाचा वापर करत आहे, त्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तसेच कोर्टाने बुधवारी रशियाला युक्रेनवरील हल्ले थांबवण्याचे आदेश दिले. न्यायाधीश जोन डोनोग्यू यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालय आणि ICJ ला सांगितले की “रशिया ज्याप्रमाणे युक्रेनविरोधात बळाचा वापर करतंय ते चिंताजनक असून त्यामुळे आंतरराष्ट्रीय कायद्यात अतिशय गंभीर समस्या निर्माण होत आहेत. म्हणून रशियाने २४ फेब्रुवारी रोजी सुरू केलेली लष्करी कारवाई ताबडतोब थांबवावी.”

तसेच भारताने रशिया युक्रेन युद्धात तठस्थ भूमिका घेतली आहे. त्यामुळे भारतावर टीका देखील झाली पण भारत हा रशियाचा मित्र असल्याने भारताने रशिया-युक्रेन वादात तठस्थ रुजण्याची भूमिका घेतली आहे. पण भारताने मात्र आंतरराष्ट्रीय न्यायालयात रशियाच्या विरुद्ध भूमिका घेतलेली पहायला मिळाली. दरम्यान, रशिया युक्रेनविरोधात बळाचा वापर करत असून आंतरराष्ट्रीय कायद्यात अतिशय गंभीर समस्या निर्माण होत आहेत. असं न्यायाधीश जोन डोनोग्यू यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालय आणि ICJ ला सांगितले. ICJ मधील भारताचे न्यायमूर्ती दलवीर भंडारी यांनी रशियाच्या विरोधात मतदान केले आहे. न्यायमूर्ती भंडारी यांनी रशियाच्या विरोधात मतदान केल्यामुळे अशी तटस्थ भूमिका भारताने घेतलेल्या अधिकृत भूमिकेपेक्षा वेगळी आहे.

रशियाने युक्रेनमधील नवीन देशाला मान्यता दिल्यानंतर भारताने या संपूर्ण प्रकरणात तटस्थ भूमिका घेतली असून भारताने या संपूर्ण प्रकरणात लक्ष ठेवलं आहे. दोन्ही देशांमधील तणाव संपवण्यासाठी राजनैतिक संवाद प्रस्थापित करण्यावर भर देत आहे. तसेच रशिया आणि युक्रेनमधील हालचालींवर भारत बारकाईने लक्ष ठेवून आहे.

Related Stories

समता पक्षाची याचिका हायकोर्टाने फेटाळली

Archana Banage

खाद्यतेलाच्या वाढत्या किमतीमुळे सरकार चिंतेत

Patil_p

हरियाणामध्ये कोरोना बाधितांची संख्या 11,520

Tousif Mujawar

एका छोटय़ा छिद्रात सामावते नदी

Patil_p

ब्रिटनमध्ये भारतीय विद्यार्थिनीची हत्या

Patil_p

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर होणार मोठी कारवाई?

Archana Banage